Thalapathy Vijay : दाक्षिणात्य सुपरस्टार, राजकारणी थलपती विजय हा मागील काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आहे. अभिनेत्याची पत्नी संगीता सोर्नालिंगमने चेंगलपट्टू येथील जिल्हा न्यायलयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. शिवाय त्याचे एका अभिनेत्रीबरोबर विवाहबाह्य संबंध असल्याचा मोठा आरोप देखील तिने केला आहे.त्यात दुसरीकडे त्याचा राजकारणातील प्रवेश आणि शेवटचा सिनेमा म्हणून घोषित केलेल्या ‘जन नायगन’ या चित्रपटामुळे तो चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. दिवसेंदिवस या सिनेमाच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.त्यात आता या चित्रपटाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
दरम्यान, अभिनयातून निवृत्त होण्यापूर्वीच थलापती विजयचा शेवटचा चित्रपट 'जन नायगन' ९ जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता.परंतु, हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाशी कायदेशीर अडचणीत अडकला आणि वारंवार त्याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. परिणामी, चाहते अजूनही या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रतीक्षा करत आहेत.'जन नायगन' च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर होण्याआधीच आता अभिनेत्याला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
मिडिया रिपोर्टनुसार, एकीकडे 'जन नायगन'ला सिनेमागृहात प्रदर्शित होण्यास वेळ लागत असल्याने ओटीटीवर सिनेमा पाहता येईल, अशी आशा त्याच्या चाहत्यांनी होती. परंतु, अमेझॉन प्राइमने चित्रपटासोबतचा ओटीटी करार रद्द केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार १२० कोटींमध्ये या चित्रपटाचे डिजीटल हक्क विकण्यात आले होते.मात्र, हा करार आता रद्द करण्यात आला आहे. 'जन नायगन' चित्रपटाला अद्यापही सेन्सॉरने मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे तो चित्रपटगृहांमध्ये कधी प्रदर्शित होईल याबद्दल अस्पष्टता आहे. त्याचा फटका आता सिनेमाला बसला असून त्यामुळे आता थलपती विजयच्या सिनेमाची ओटीटी डिलही कॅन्सल झाली आहे.
जन नायगन सिनेमात राजकारणाविषयीची कथा आहे. यामध्ये थलपती विजय भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवताना दिसतो. भ्रष्टाचाराला वाचा फोडत असताना तो गरिबांचा मसीहा बनतो आणि राज्याचा मुख्यमंत्री होतो.
Web Summary : Amid divorce rumors, Thalapathy Vijay faces another blow. His film 'Jan Nayagan's' OTT deal with Amazon Prime, worth ₹120 crore, has been canceled due to censor issues and delayed theatrical release, adding to his woes.
Web Summary : तलाक की अफवाहों के बीच, थलपति विजय को एक और झटका लगा है। सेंसर मुद्दों और नाटकीय रिलीज में देरी के कारण उनकी फिल्म 'जन नायगन' की अमेज़ॅन प्राइम के साथ ₹120 करोड़ की ओटीटी डील रद्द हो गई है, जिससे उनकी परेशानियाँ बढ़ गई हैं।