Join us
Daily Top 2Weekly Top 5

दुहेरी आनंदाची गोड बातमी! सुपरस्टार राम चरणच्या घरी दुसऱ्यांदा पाळणा हळला, पत्नीने दिला जुळ्या बाळांना जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 08:31 IST

लग्नानंतर १३ वर्षांनी दुसऱ्यांदा बाबा झाला सुप्रसिद्ध अभिनेता,घरी जुळ्या मुलांचं आगमन, होतोय शुभेच्छांचा वर्षाव

Ram Charan And Wife Upasana Konidela Blessed With Twins: मनोरंजन विश्वातून एक गोड बातमी समोर आली आहे.दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता राम चरणने त्याच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. सुपरस्टार अभिनेता रामचरण दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. अभिनेत्याच्या घरी दोन नवीन सदस्यांचं आगमन झालं आहे. त्याची पत्नी उपासनाने गोंडस जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. सोशल मीडियावर अभिनेते चिरंजीवी यांनी खास पोस्ट लिहून ही गोड बातमी चाहत्यांना दिली आहे.

दरम्यान, राम चरणचे वडील म्हणजेच अभिनेते चिरंजीवी यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर अभिनेते चिरंजीवी यांनी पोस्ट शेअर करत त्यामध्ये म्हटलंय, "अतिशय आनंद आणि कृतज्ञतेच्या भावनेने आम्ही हे कळवू इच्छितो की, @AlwaysRamCharan आणि @upasanakonidela यांना जुळ्या मुलांचं आगमन झालं आहे. बाळं आणि आई दोघेही निरोगी असून त्यांची प्रकृती उत्तम आहे.नातवंडांच्या रूपात या चिमुकल्यांचे आमच्या कुटुंबात स्वागत करणे हा आमच्यासाठी आजी-आजोबा म्हणून अत्यंत आनंदाचा आणि दैवी आशीर्वादाचा क्षण आहे.तुमच्या प्रार्थना, प्रेम, आशीर्वाद आणि सदिच्छांबद्दल आम्ही सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो." अशा आशयाची पोस्ट लिहून चिरंजीवी यांनी आपल्या चाहत्यांना  ही गोड बातमी दिली आहे.

राम चरण आणि उपासना दुसऱ्यांदा पालक  झाले आहेत. २०२३ मध्ये राम चरण आणि उपासना यांना मुलगी झाली असून तिचं नाव क्लिन कारा ठेवण्यात आलं. २०१२ मध्ये राम चरण आणि उपासनाने लग्न केलं. १३ वर्षांच्या लग्नानंतर, राम चरण आणि उपासना दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहेत. या जोडप्याला एक मुलगा आणि एक मुलगी असे ट्विन्स झाले आहेत. त्यामुळे सध्या राम चरणच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. विशेष म्हणजे अभिनेत्याच्या घरी जुळ्या मुलांचं आगमन झाल्याने त्याचे चाहते देखील प्रचंड खुश झाल्याचे पाहायला मिळत आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ram Charan and Upasana welcome twins, a boy and a girl!

Web Summary : Superstar Ram Charan and Upasana are blessed with twins! Chiranjeevi announced the arrival of a baby boy and a baby girl. Both mother and babies are healthy. The family is overjoyed with the new additions after welcoming a daughter in 2023.
टॅग्स :राम चरण तेजाTollywoodचिरंजीवीसेलिब्रिटीसोशल मीडिया