Join us
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! ८५व्या वर्षी प्रसिद्ध निर्मात्याची आत्महत्या, ब्रीजवरुन नदीत उडी घेत संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 11:16 IST

तमिळ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध निर्माता के राजन यांनी धक्कादायक पाऊल उचललं. के राजन यांनी नदीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

सिनेसृष्टीतून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. तमिळ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध निर्माता के राजन यांनी धक्कादायक पाऊल उचललं. के राजन यांनी नदीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ते ८५ वर्षांचे होते. एवढ्या मोठ्या प्रसिद्ध निर्मात्याने आत्महत्या केल्याने सिनेसृष्टी हादरली असून कलाकारांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. 

तमिळ वन इंडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार, चेन्नईमधील अद्यार ब्रीजवरुन उडी घेत के राजन यांनी त्यांचं आयुष्य संपवलं. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाकडून घटनास्थळी पोहोचून त्यांचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला असून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. याप्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते कुटुंबापासून वेगळे राहत होते, अशी माहिती मिळत आहे. ज्यादिवशी त्यांनी आत्महत्या केली त्यादिवशी ते ड्रायव्हरसोबत होते. थोडं फिरुन येतो असं सांगून त्यांनी गाडीतून उतरत थेट नदीत उडी घेत आत्महत्या केली.

के राजन यांनी १९८३ मध्ये ब्रह्मचारीगल या सिनेमातून निर्माते म्हणून त्यांच्या कारकीर्दीला सुरुवात केली होती. 'गणेश सिने आर्ट्स' ही निर्मिती संस्था त्यांनी सुरू केली होती. ज्याद्वारे त्यांनी अनेक सिनेमांची निर्मिती केली होती. निर्भिड आणि ठामपणे मतं मांडण्यासाठी ते ओळखले जायचे. के राजन यांनी अचानक घेतलेल्या एक्झिटमुळे तमिळ सिनेसृष्टीचं फार मोठं नुकसान झालं आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Tamil Producer K Rajan Dies by Suicide at 85

Web Summary : Renowned Tamil producer K Rajan tragically ended his life, jumping from a bridge in Chennai at the age of 85. He had been living separately from his family. Police are investigating the circumstances surrounding his death. He produced many films under Ganesh Cine Arts.
टॅग्स :Tollywoodमृत्यूसेलिब्रिटी