Join us

ट्राफिक होम गार्डचे कपडे फाडले, फोन हिसकावला अन्...; साऊथ अभिनेत्रीचा रस्त्यावरच राडा, पोलिसांत तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 08:54 IST

साऊथ अभिनेत्रीकडून ट्राफिक होम गार्डला मारहाण, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

तेलुगु अभिनेत्री सौम्या जानू चर्चेत आली आहे. तिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हैदराबादमधील बंजारा हिल्स येथील रस्त्यावरच अभिनेत्रीने राडा केल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. तिने ड्युटीवर असलेल्या ट्राफिक होम गार्डला मारहाण केली आहे. तिचा हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत अभिनेत्रीवर कारवाईची मागणी केली आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, शनिवारी २४ फेब्रवारीला हैदराबादमधील बंजारा हिल्स येथील रस्त्यावर सौम्या जानू उलट दिशेने गाडी चालवत होती. ट्राफिक होम गार्डने तिला अडवल्यानंतर तिने रागाच्या भरात त्याला शिवीगाळ केली. त्यानंतर त्याला मारहाणही केली. आजूबाजूच्या लोकांनी अभिनेत्रीला शांत राहण्यास सांगितलं. पण, तरीही सौम्याचा राग अनावर झाला. तिने ड्युटीवर असलेल्या होमगार्डचे कपडे फाडले, त्यानंतर त्याचा फोनही हिसकावून घेतला. तिथे असलेल्या उपस्थितांनी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ शूट करून तो व्हायरल केला आहे. 

या संपूर्ण घटनेनंतर ट्राफिक होम गार्डने बंजारा पोलीस स्टेशनमध्ये अभिनेत्रीविरोधात तक्रार दाखल केली आहे. याबरोबरच त्याने व्हिडिओही दाखवला आहे. या घटनेचा पोलीस तपास करत आहेत. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सौम्या जानूवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. 

टॅग्स :Tollywoodसेलिब्रिटी