Join us
Daily Top 2Weekly Top 5

दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीने गुपचूप उरकलं लग्न? 'तो' फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2023 13:34 IST

साई पल्लवीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोवरुन साई पल्लवीने गुपचूप लग्न उरकलं की काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. 

सध्या मनोरंजनविश्वात लगीनघाई सुरू आहे. एकामागोमाग एक कलाकार विवाहबंधनात अडकत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राची लगीनघाई सुरू असतानाच दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीने लग्न केल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. साई पल्लवीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोवरुन साई पल्लवीने गुपचूप लग्न उरकलं की काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. 

व्हायरल झालेल्या फोटोमध्ये साई पल्लवी एका व्यक्तीबरोबर दिसत आहे. या फोटोत दोघांच्याही गळ्यात वरमाला दिसत आहे. त्यामुळे साई पल्लवीने लग्न केल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. साई पल्लवीने खरंच लग्न केलं का? अशी चर्चा तिच्या चाहत्यांमध्ये रंगली आहे. 

दिग्दर्शक राजकुमार यांनी साई पल्लवीचा हा फोटो त्यांच्या ट्विटरवरुन शेअर करत या व्हायरल फोटोमागचं सत्य सांगितलं आहे. साई पल्लवीचा हा फोटो एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा आहे. या फोटोत तिच्याबरोबर तिचा सहकलाकार सिवा कार्तिकेयन दिसत आहे. एसके२१ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा हा फोटो असल्याचं राजकुमार यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे साई पल्लवीने लग्न केलं नसल्याचं स्पष्ट झालं आहे. 

टॅग्स :साई पल्लवीसेलिब्रिटी