Join us

हाडांचा सापळा अन् शरीराला लागले होते किडे; मृत्यूशी झुंज देत रस्त्यावर आढळली अन्; अभिनेत्रीचा झाला दुर्दैवी शेवट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 13:41 IST

निर्मात्याने फसवणूक करुन वेश्या व्यवसायात ढकललं अन्...

South Actress Nisha Noor : अभिनयाच्या चंदेरी दुनियेत काम मिळण्यासाठी नशीब असावं लागतं असं म्हटलं जातं. हे क्षेत्र बाहेरुन जितकं ग्लॅमरस वाटतं पण, त्याचं वास्तव फार भीषण आहे. नशीबाने दगा दिला तर हे क्षेत्र निष्ठूर होत एखाद्याला प्रवाहातून कसे बाहेर फेकतं याचं जिवंत उदाहरण म्हणजे अभिनेत्री निशा नूर. करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना अचानक अभिनेत्रीच्या नशीबाचे फासे पलटले, फसवणूक करत तिला वेश्या व्यवसायात ढकलण्यात आलं आणि एका गंभीर आजारामुळे तिचा दुर्दैवी अंत झाला. 

निशा नूर ही ८० च्या दशकातील एक आघाडीची अभिनेत्री होती.तमिळ,तेलुगू,मल्याळम आणि कन्नड भाषेतील चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या निशाचा चाहतावर्ग  खूप मोठा आहे. अभिनयाच्या हौसेपायी आई-वडिलांना न सांगताच ती घर सोडून पळाली. १९८० मध्ये आलेल्या मंगला नायकी चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलं नाही.नूर सुंदर होती, म्हणून तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या.कमल हसन आणि रजनीकांत सारख्या दाक्षिणात्य सुपरस्टार्ससोबत तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं.जवळपास १७ चित्रपटांमध्ये तिने सहाय्यक अभिनेत्रीचं काम केलं. पण, तिच्या अभिनयाचं सगळीकडेच कौतुक झालं. सगळं काही सुरुळित सुरु असताना अचानक तिच्या करिअरला उतरती कळा लागली. चित्रपटांमध्ये काम मिळत नसल्याने अभिनेत्रीवर मोठं संकट उभं राहिलं. 

निर्मात्याने फसवलं अन्...

मिडिया रिपोर्ट्सनुसार,एका निर्मात्याने निशा नूरची फसवणूक केली आणि तिला वेश्याव्यवसायात ढकळलं. त्यानंतर तिला दलदलीतून बाहेर पडणं अवघड झालं.  त्यामुळे तिने स्वतःला चित्रपट जगतापासून पूर्णपणे दूर केलं. शिवाय इंडस्ट्रीनेही तिच्याकडे पाठ फिरवली. 

निशा नूर तिच्या अखेरच्या दिवासात एका दर्ग्याबाहे खूप विचित्र अवस्थेत सापडली. तिच्या शरीराला किडे लागले होते. आर्थिक संकटात असताना तिला कोणीी आधार दिला नाही.मरताना तिच्या हाडांचा सापळाच तेवढा उरला होता.यानंतर,एका एनजीओने निशा नूरवर रुग्णालयात उपचार केलं,परंतु एका आठवड्यानंतर तिचा मृत्यू झाला.

टॅग्स :सेलिब्रिटीरजनीकांतकमल हासनसिनेमा