Join us

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रीचं कॅन्सरने निधन, ५७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 13:50 IST

साऊथ इंडस्ट्रीमधून एक दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध कन्नड अभिनेत्रीचं कॅन्सरने निधन झालं आहे.

साऊथ इंडस्ट्रीमधून एक दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री आणि अँकर असलेल्या अपर्णा वास्तारे यांचं  निधन झालं आहे. त्या ५७ वर्षांच्या होत्या. कॅन्सरमुळे अभिनेत्रीची प्राणज्योत मालवली. त्यांना स्टेज ४चा कॅन्सर होता. गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण, अखेर त्यांची कॅन्सरशी झुंज संपली. त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. 

अपर्णा यांनी १९८५ साली मसानदा होवु सिनेमातून कन्नड फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवलं होतं. काही टीव्ही मालिकांमध्येही त्या झळकल्या होत्या. अभिनेत्री असण्याबरोबरच त्या एक अँकर आणि रेडिओ आरजेदेखील होत्या. ऑल इंडिया रेडिओमध्ये त्यांनी रेडिओ जॉकी म्हणून काम केलं होतं. त्यांनी मेट्रोसाठी कन्नड भाषेत आवाज दिला होता. 

अपर्णा यांना दोन वर्षांपूर्वी कॅन्सरचं निदान झालं होतं, अशी माहिती त्यांचे पती नागराज यांनी दिली आहे. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना स्टेज ४ कॅन्सर होता. अपर्णा यांच्या पश्चात आता त्यांचे पती नागराज हे एकटेच आहेत. 

टॅग्स :Tollywoodसेलिब्रिटीकर्करोग