Join us
Daily Top 2Weekly Top 5

रश्मिका मंदानाला विसरा, आता ही साऊथ अभिनेत्री बनली 'नॅशनल क्रश'; दुप्पट केलं मानधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 14:42 IST

वयाच्या १९ व्या वर्षीच केलं पदार्पण, नुकत्याच रिलीज झालेल्या सिनेमात दिले इंटिमेट सीन्स

सध्या फिल्म इंडस्ट्रीत दर आठवड्याला एक नवीन अभिनेत्री 'नॅशनल क्रश' म्हणून लोकप्रिय होत आहे. कधी श्रद्धा कपूर, कधी रश्मिका मंदाना तर कधी तृप्ती डिमरी यांना नॅशनल क्रशचा टॅग मिळाला. आता आणखी एक अभिनेत्रीला तो टॅग मिळाला आहे. ही अभिनेत्री साऊथ इंडस्ट्रीतील असून एका सिनेमात इंटिमेट सीन दिल्यानंतर तिने तिची फीसही दुप्पट केली आहे. कोण आहे ही हसीना?

रश्मिका मंदाना साऊथमधून आली आहे. 'गीता गोविंदम' सिनेमानंतर अनेकांनी तिला नॅशनल क्रश बनवले. पण आता तिला टक्कर द्यायला तिच्याच इंडस्ट्रीतली एक अभिनेत्री आली आहे. ती म्हणजे अनुपमा परमेश्वरन (Anupama Parmeswaran). गेल्या १० वर्षांपासून ती मल्याळम, तमिळ आणि तेलुगु सिनेमांमध्ये भूमिका साकारत आहे. अनुपमाने वयाच्या 19 व्या वर्षीच 'प्रेमम' सिनेमातून पदार्पण केले. यानंतर ती 'कोडी', 'रक्षासुडू', 'कार्तिकेय 2' मध्येही दिसली. तर नुकताच तिचा तेलुगु सिनेमा 'टिल्लू स्क्वायर' रिलीज झाला. या सिनेमाने तिला नॅशनल क्रश बनवलं आहे. 40 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने जगभरात 130 कोटींचा बिझनेस केला आहे. या सिनेमात अनुपमा आणि सिद्धू जोन्नालगड्डाची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली. यात त्यांनी दिलेल्या इंटिमेट सीन्सची सध्या खूप चर्चा आहे.

एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, अनुपमाने 'टिल्लू स्क्वायर' सिनेमानंतर तिच्या मानधनात वाढ केली आहे. आता ती आधीपेक्षा दुप्पट मानधन आकारत आहे. एका सिनेमासाठी ती आतापर्यंत १ कोटी घ्यायची जे आता तिने २ कोटी केले आहे. तसंच तिच्यासमोर सिनेमांची रांग लागली आहे. 'हनुमान' फेम दिग्दर्शक प्रशांत वर्मा यांच्या आगामी 'ऑक्टोपस' मध्ये ती झळकणार आहे. शिवाय ध्रुव विक्रमच्या 'बायसन', आणि 'जेएसके' सिनेमांमध्ये ती आहे. सोशल मीडियावर अनुपमाचे १६ मिलियन फॉलोअर्स आहेत. सध्या तिने संपूर्ण इंडस्ट्रीचं आणि चाहत्यांचंही लक्ष वेधून घेतलंय.

टॅग्स :Tollywoodसेलिब्रिटी