Prakash Raj Mother Passes Away: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांच्या आई स्वर्णलता (Suvarnalatha) यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही काळापासून त्यांच्यावर वयोमानाशी संबंधित समस्यांवर उपचार सुरू होते. मात्र, काल रविवार २९ मार्च रोजी त्यांची राहत्या घरी प्राणज्योत मालवली.
प्रकाश राज यांच्या आई स्वर्णलता बऱ्याच काळापासून आजारपणामुळे त्रस्त होत्या.त्यांच्या आईच्या मेंदूत गाठी झाल्या होत्या. याची माहिती स्वत: प्रकाश राज यांनी दिली होती. शिवाय त्यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया सुद्धा झाल्या होत्या. उपचारादरम्यान त्यांची स्मरणशक्तीही गेली होती. दरम्यान, प्रकाश राज यांच्या आईच्या निधनाची बातमी समोर येताच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्याच्या आईला श्रद्धांजली अर्पण केल्याचं पाहायला मिळतंय. सुवर्णलता यांच्या पार्थिवावर आजच म्हणजे सोमवारी संध्याकाळी बंगळुरू इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि अभिनेते पवन कल्याण यांनी प्रकाश राज यांच्या आईच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ट्विटरवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय, "प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांच्या मातोश्री श्रीमती स्वर्णलता यांचे निधन झाल्याचे कळल्याने मला अत्यंत दुःख झाले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि प्रकाश राज यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो."
स्वर्णलता यांच्या पश्चात तीन मुले आहेत, त्यांपैकी प्रकाश सर्वात मोठे आहेत. प्रकाश राज यांनी अनेकदा मुलाखतींमध्ये आपल्या आईच्या संघर्षाचा उल्लेख केला आहे.त्यांच्या यशामागे आईचं मोठं योगदान असल्याचं त्यांनी नेहमीच आवर्जून सांगितलं होतं.
Web Summary : Prakash Raj's mother, Suvarnalata, passed away at 86 due to age-related ailments. She had been suffering from brain tumors and memory loss. Celebrities expressed condolences, and her funeral will be in Bangalore. Andhra Pradesh's Deputy CM Pawan Kalyan also offered his condolences.
Web Summary : अभिनेता प्रकाश राज की मां सुवर्णलता का 86 वर्ष की आयु में निधन हो गया। वे वृद्धावस्था संबंधी बीमारियों से पीड़ित थीं, जिनमें मस्तिष्क का ट्यूमर और स्मृति हानि शामिल थे। कई हस्तियों ने शोक व्यक्त किया। अंतिम संस्कार बेंगलुरु में किया जाएगा। आंध्र प्रदेश के उपमुख्यमंत्री पवन कल्याण ने भी संवेदना व्यक्त की।