Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याने गुपचूप उरकलं लग्न, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 13:50 IST

दाक्षिणात्य अभिनेत्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता अशोक सेल्वनने गुपचूक लग्न उरकलं आहे. अशोकने अभिनेत्री किर्ती पांडियनबरोबर लग्नगाठ बांधथ त्याच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. किर्ती ही प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता अरुण पांडियन यांची मुलगी आहे. अशोक सेल्वनने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. त्याच्या या फोटोवर कमेंट करत चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

काही महिन्यांपूर्वीच अशोक सेल्वन आणि किर्ती पांडियन यांचा साखरपुडा पार पडला होता. त्यांच्या साखरपुड्याला अगदी मोजकेच पाहुणे उपस्थित होते. कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत अशोक आणि किर्ती यांनी सप्तपदी घेत नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. अगदी पारंपरिक दाक्षिणात्य पद्धतीने त्यांचा विवाहसोहळा पार पडला. अशोक आणि किर्तीने लग्नासाठी खास पारंपरित पोशाख केला होता. क्रिम रंगाच्या पेहरावात त्यांनी ट्विनिंग केलं होतं. अशोकने लुंगी परिधान केली होती. तर किर्तीने साडी नेसून पारंपरिक लूक केला होता.

धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत हेमा मालिनींचा मोठा खुलासा, म्हणाल्या, “ते अमेरिकेला...”

‘वेलकम ३’मधून उदय शेट्टी गायब! नाना पाटेकर स्पष्टच बोलले, म्हणाले, “त्यांना वाटतं आम्ही...”

अशोक आणि किर्तीने बुधवारी(१३ सप्टेंबर) लग्न केल्याची माहिती आहे. लग्नानंतर ते चेन्नईत वेडिंग रिसेप्शन देणार आहेत. अशोक-किर्तीच्या वेडिंग रिसेप्शनला सिनेजगतातील सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत. अशोक सेल्वनने ‘सूथु कव्वुम’ या तामिळ चित्रपटातून पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘पिज्जा २’, ‘थेगिडी’, ‘सावले समाली’, ‘मनमथा लीलाई’, ‘हॉस्टल’, ‘सम पीपल’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांत तो दिसला. तर किर्तीने ‘थुम्बा’, ‘अंबिरकिनियाल’ या चित्रपटांत महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

टॅग्स :टेलिव्हिजन