कलाकारांना चाहत्यांचं प्रेम मिळतं. पण याच चाहत्यांमुळे अनेकदा कलाकारांना मनस्तापाला सामोरं जावं लागलं. अशीच एक घटना घडली साउथ सुपरस्टार अजितसोबत. काहीच दिवसांपूर्वी अजितला (ajith kumar) भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्याहस्ते पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. हा पुरस्कार स्वीकारून घरी परतत असताना एअरपोर्टवर अजितला चाहत्यांनी घेरलं. परंतु चाहत्यांच्या याच गर्दीमुळे अजितला दुखापत झाली आणि त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं.
कशी झाली अजितला दुखापतपद्मभूषण पुरस्काराचा स्वीकार करुन अजित कुमार नवी दिल्लीहून चेन्नईला त्यांच्या घरी परतत होता. अजितचं शानदार स्वागत करण्यासाठी त्याचे चाहते एअरपोर्टवर त्याची वाट बघत होते. अजित कुमार एअरपोर्टवर येताच चाहत्यांनी एक जल्लोष केला. गर्दीही प्रचंड झाली आणि या चाहत्यांच्या गराड्यात अजित कुमार अडकला. अशातच त्यांच्या पायाला दुखापत झाली. त्यामुळे अजितला तत्काळ चेन्नईमधील एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं.
कधी मिळणार अभिनेत्याला डिस्चार्ज
मीडिया रिपोर्टनुसार अजित कुमारच्या पायाला झालेली दुखापत अत्यंत किरकोळ असून त्याच्यावर व्यवस्थित उपचार करण्यात येणार आहेत. हे उपचार केल्यावर अजितला आज संध्याकाळी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळू शकतो. त्यामुळे अजित कुमारच्या चाहत्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. अजित कुमार यांची भूमिका असलेला 'गुड, बॅड, अग्ली' सिनेमा काहीच दिवसांपूर्वी रिलीज झाला. २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा तामिळ सिनेमा म्हणून या सिनेमाकडे पाहिलं जातंय.