Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 15:26 IST

शोभिता धुलिपालाच्या प्रेग्नंसीच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहेत.

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वात चर्चेतलं कपल म्हणजे नागा चैतन्य-शोभिता धुलिपाला. २०२४ मध्ये नागा चैतन्यने शोभिताशी दुसरं लग्न केलं. समंथाशी घटस्फोटानंतर त्याने शोभिताशी लग्नगाठ बांधल्याने तो खूप ट्रोल झाला होता. शोभिता आणि नागा दोन वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. नंतर त्यांनी थाटात पारंपरिक पद्धतीने लग्न केल. नुकतंच दोघांनी लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. आता शोभिता प्रेग्नंट असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर सासरे नागार्जुन यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

शोभिता धुलिपालाच्या प्रेग्नंसीच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहेत. अनेकदा ती बेबी बंप लपवतानाचे आणि लूज कपडे घातलेले व्हिडीओही आले. मात्र दरवेळी या अफवाच निघाल्या. आता नागार्जुन यांनी स्वत:च ते आजोबा कधी होणार यावर प्रतिक्रिया दिली आहे. 'सुमन टीव्ही'ला दिलेल्या मुलाखतीत नागार्जुन म्हणाले,"योग्य वेळ आल्यावर मी तुम्हाला नक्कीच सांगेन." यावर नागार्जुन यांनी शोभिताच्या प्रेग्नंसीच्या चर्चांवर ना होकार दिला आणि नकारही दिला नाही. यावरुन चाहते नागार्जुन आणि कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.

नागा चैतन्य आणि शोभिता २०२२ पासून रिलेशनशिपमध्ये होते. तिला चैतन्यच्या घरी पाहिल्यावर त्यांचं प्रेमप्रकरण सर्वांसमोर आलं. नंतर त्यांना सोबत व्हेकेशन एन्जॉय करतानाही पाहिलं गेलं. दोघांनी नातं लपवण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला. नंतर ऑगस्ट २०२४ मध्ये त्यांचा साखरपुडा झाला आणि त्यांचं नातं जगजाहीर झालं. त्याचवर्षी डिसेंबर महिन्यात दोघांनी लग्नगाठ बांधली. आता शोभिता गुडन्यूज कधी देणार याकडे चाहत्यांचं लक्ष आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Is Sobhita Dhulipala Pregnant? Nagarjuna's Response Fuels Speculation

Web Summary : Naga Chaitanya and Sobhita Dhulipala's marriage sparks pregnancy rumors. Nagarjuna's ambiguous response to questions about becoming a grandfather adds fuel to the fire, exciting fans.
टॅग्स :नागार्जुनसेलिब्रिटीTollywoodप्रेग्नंसी