Join us
Daily Top 2Weekly Top 5

रजनीकांतचा 'कुली' पाहण्यासाठी 'या' कंपनीने दिली कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी, जेवणाचीही केली सोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 14:07 IST

'कुली' सिनेमा पाहण्यासाठी एका कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी सुट्टी जाहीर केलीय. इतकंच नव्हे या कंपनीने सर्वांसाठी जेवणाचीही सोय केली आहे

रजनीकांतच्या आगामी 'कुली' सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे. या सिनेमात भारतीय मनोरंजन विश्वातील प्रमुख कलाकार एकत्र आले आहेत. रजनीकांत मुख्य भूमिकेत असून सोबत मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान, सुपरस्टार नागार्जुन, सत्यराज, सोहबीन साहीर हे साउथ सिनेसृष्टीतील लोकप्रिय कलाकार झळकणार आहेत. 'विक्रम', 'लिओ' सारख्या सिनेमांचं दिग्दर्शन करणारा लोकेश कनगराज या सिनेमाचं दिग्दर्शन करतोय. 'कुली' सिनेमाची क्रेझ इतकी जबरदस्त आहे की, हा सिनेमा पाहण्यासाठी एका कंपनीने सुट्टी जाहीर करुन कर्मचाऱ्यांच्या जेवणाची सोयही केली आहे.

'कुली'ची क्रेझ  सोशल मीडियावर एका कंपनीने काढलेली नोटिस व्हायरल झाली आहे. फार्मर कन्ट्रक्शन्स कंपनी प्रायव्हेट लिमिटेड यांनी ही नोटिस काढली आहे. यामध्ये लिहिलंय की १४ ऑगस्टला रजनीकांतचा 'कुली' हा सिनेमा रिलीज होणार आहे. त्यानिमित्ताने कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय कंपनीने सर्वांना 'कुली' सिनेमाची तिकिटंही दिली आहेत. इतकंच नव्हे तर, कर्मचाऱ्यांसाठी शोनंतर जेवणाचीही सोय करण्यात आली आहे. त्यामुळे या कंपनीतील कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. ही कंपनी सिंगापूरमध्ये आहे. त्यामुळेच 'कुली' सिनेमाची भारतात नव्हे तर परदेशातही चांगलीच क्रेझ असल्याचं दिसतंय.

'कुली' सिनेमाविषयी

लोकेश कनगराज दिग्दर्शित 'कुली' हा सिनेमा उद्या अर्थात १४ ऑगस्टला रिलीज होणार आहे. या सिनेमात रजनीकांत, नागार्जुना अक्कीनेनी, सौबीन साहीर, श्रुती हसन, उपेंद्र राव, सत्यराज हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने बॉलिवूड अभिनेता आमिर खान साउथ इंडस्ट्रीत पदार्पण करतोय. आमिर खान - रजनीकांत यांना अनेक दिवसांनी एकत्र मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. रजनीकांत यांचे चाहते हा सिनेमा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

टॅग्स :रजनीकांतआमिर खानबॉलिवूडTollywoodनागार्जुनसिंगापूर