Join us

Allu Arjun : अल्लू अर्जुनच्या जामीन अर्जाबाबत मोठी बातमी! कोर्टातील घडामोड काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 15:02 IST

संध्या चित्रपटगृहात झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणात मोठं अपडेट आलं आहे.

Allu Arjun : साऊथ इडंस्ट्रीतून मोठी बातमी समोर आली आहे. 'पुष्पा २'च्या प्रीमिअर शोदरम्यान हैदराबादमधील संध्या चित्रपटगृहात झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणात (Sandhya Stampede Incident) मोठं अपडेट आलं आहे.  संध्या चित्रपटगृह चेंगराचेंगरीप्रकरणात आज सुनावणी झाली. या सुनावणीला सुरक्षेचा विचार करून  साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन व्हर्चुअली उपस्थित दर्शवली होती. अल्लू अर्जुनचा अंतरिम जामीन कायम राहणार आहे.  

संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुनला १३ डिसेंबर २०२४ रोजी अटक करण्यात आली. त्याला राहत्या घरातून ताब्यात घेऊन १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. यावर त्याला ४ आठवड्यांसाठी अंतरिम जामीन मिळाला. मात्र, कागदपत्रांच्या विलंबामुळे अल्लू अर्जुनला एक रात्र तुरुंगात घालवावी लागली होती.  त्यानंतर १४ डिसेंबरला त्यांची तुरुंगातून सुटका झाली. तो अंतरिम जामीन आज न्यायालयाने कायम ठेवला आहे.

आज सुनावणीदरम्यान जामीन प्रकरणी प्रतिवाद सादर करण्यासाठी आणखी काही वेळ पोलिसांनी मागितला आहे. तर अभिनेत्याकडूनकडून पुन्हा जामीन अर्ज दाखल केला असून त्यावर ३० डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. तसेच न्यायालयाने न्यायालयाने संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणाची पुढील सुनावणी १० जानेवारी रोजी ठेवली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

 गेल्या ४ डिसेंबर रोजी संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा 2’ या चित्रपटाचा प्रीमिअर आयोजित करण्यात आला होता. यावेळी अचानक अल्लू अर्जुन तिथे आल्याने चाहत्यांनी एकच गर्दी केली. या गर्दीत चेंगराचेंगरी झाली आणि त्यात रेवती नावाच्या महिलेचा मृत्यू झाला. तर त्या महिलेच्या नऊ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला. सध्या मुलावर उपचार सुरू असून तो प्रतिसाद देतोय.  या घटनेनंतर पोलिसांनी मृत महिलेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे चिक्कडपल्ली पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५ आणि ११८(१) अंतर्गत अभिनेता अल्लू अर्जुन, त्याचे सुरक्षा पथक आणि चित्रपटगृह व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा नोंदवला होता.  

टॅग्स :अल्लू अर्जुनसेलिब्रिटी