Join us

डिनर डेटनंतर संतापलेला दिसला समांथाचा रुमर्ड बॉयफ्रेंड राज निदिमोरू, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 11:59 IST

समांथा आणि राज हे डिनर डेटनंतर स्पॉट झाले.

अभिनेत्री समांथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) हिनं दाक्षिणात्य चित्रपटसृष्ट्रीसह बॉलिवूडमध्येही एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अभिनेत्रीच्या प्रोफेशनल लाईफइतकीच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त चर्चा तिच्या पर्सनल लाईफची होते. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री 'सिटाडेल: हनी बनी' या चित्रपटाचे दिग्दर्शक राज निदिमोरू यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरू आहेत. नुकतंच  राज निदिमोरू  आणि समांथा एकत्र दिसले. पण, यावेळी राज निदिमोरू हा पापाराझींवर संतापलेला पाहायला मिळाला.

समांथा आणि राज हे डिनर डेटनंतर स्पॉट झाले. काला रात्री दोघे मुंबईतील एका रेस्टॉरंटमधून एकत्र बाहेर पडताना दिसले. यावेळी दोघेही कॅज्युअल लूकमध्ये दिसत होते. रेस्टॉरंटमधून बाहेर येताच समांथा आणि राज हे एकाच कारमधून तेथून निघाले. राज निदिमोरू गाडीत बसला असतानाच पापाराझींनी त्याला घेरलं. यावेळी गाडीचा दरवाजा बंद करत असताना तो रागाने पॅप्सकडे पाहताना दिसला.

दरम्यान समांथाचं पहिलं लग्न अभिनेता नागा चैतन्यशी झाले होते. २०७ मध्ये गोव्यात भव्य स्वरुपात त्यांनी लग्न केले. तथापि, लग्नाच्या चार वर्षांनंतर, २०२१ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. तर आता नागा चैतन्यचे लग्न शोभिता धुलिपालाशी झालं आहे. 

टॅग्स :समांथा अक्कीनेनीबॉलिवूडसोशल मीडिया