Join us

"मी आधीपेक्षा जास्त खूश...", असं का म्हणाली समंथा रुथ प्रभू? दोन वर्षात करते एकच सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 17:40 IST

आधी टॉप १० अभिनेत्रींमध्ये येण्यासाठी..., समंथा रुथ प्रभूने मांडलं वास्तव

दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) अनेक कारणांमुळे चर्चेत असते. सध्या ती दिग्दर्शक राज निदीमोरुला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. राजचा २०२२ पत्नीपासून घटस्फोट झाला आहे. समंथा आणि राज हातात हात घालून फिरतानाही दिसले आहेत. तर दुसरीकडे समंथा मायोसायटिस आजाराचाही सामना करत आहे. नुकतंच तिने आता तिच्या हेल्थवर भाष्य केलं आहे.

समंथा रुथ प्रभू नुकतीच एका इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. ती म्हणाली, "मी सुरुवातीला वर्षाला पाच सिनेमे करायचे. कारण हीच यशस्वी अभिनेत्रीची ओळख होती. पाच फिल्म्स, एक मोठी ब्लॉकबस्टर आणि टॉप १० अभिनेत्रींमध्ये येण्याची स्पर्धा असं सगळं होतं. एवढंच आवश्यक होतं. काही मोठे मल्टिनॅशनल ब्रँड्ससोबत कोलॅबही व्हायचंय. आज माझा दोन वर्षात एक सिनेमा येतो आणि मी कोणत्याही यादीतही येत नाही. माझ्याकडे १००० कोटींचा बिग बजेट सिनेमाही नाही. पण मी उलट आता आधीपेक्षा जास्त खूश आहे."

ती पुढे म्हणाली, "मी खूप कमजोर झाले होते. प्रत्येक शुक्रवारी चित्र वेगळं असायचं आणि मी नर्वस असायचे. उद्या कोणी येईल आणि माझी जागा घेईन असं वाटायचं. मी त्या एका शुक्रवारवर माझी किंमत ठरवायचे."

समंथा शेवटची 'सिटाडेल' या सीरिजमध्ये दिसली. तिच्यासोबत वरुण धवन होता. ही सीरिज फारशी चालली नाही. मात्र सीरिजचे दिग्दर्शक राज निदीमोरुसोबत तिच्या अफेअरची चर्चा सुरु झाली. 

टॅग्स :समांथा अक्कीनेनीTollywood