Join us
Daily Top 2Weekly Top 5

Salaar : प्रभासला मोठा धक्का! प्रदर्शित होताच ऑनलाइन लीक झाला 'सालार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2023 13:13 IST

प्रभासचा 'सालार' सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर काही वेळातच ऑनलाईन लीक झाला आहे. 

दाक्षिणात्य अभिनेता प्रभासचा 'सालार' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गेल्या कित्येक दिवसापासून चाहते प्रभासच्या या सिनेमाची वाट पाहत होते. 'सालार'च्या ट्रेलरलाही प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. अखेर आज सालार सर्वत्र प्रदर्शित झाला. पण, सिनेमा प्रदर्शित होताच प्रभासला मोठा धक्का बसला आहे. प्रभासचा 'सालार' सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर काही वेळातच ऑनलाईन लीक झाला आहे. 

सध्या सिनेमांच्या ऑनलाइन लीक होण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही वेळातच काही साइट्सवर ते लीक होतात. आता प्रभासचा 'सालार'ही प्रदर्शित झाल्यानंतर ऑनलाइन लीक झाला आहे. 'सालार'चं HD व्हर्जन तमिळ रॉकर्स, फिल्मीझिला, टेलिग्राम अशा आणखी काही पायरली साइट्सवर लीक झालं आहे. त्यामुळे 'सालार'च्या निर्मात्यांची चिंता वाढली आहे. 'सालार'बरोबरच शाहरुख खानचा 'डंकी'देखील ऑनलाइन लीक झाला आहे. 

प्रभास मुख्य भूमिकेत असलेल्या आणि २७० कोटींचं बजेट असलेल्या 'सालार' सिनेमाचं दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केलं आहे. या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगलाही मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे पहिल्या दिवशी हा सिनेमा ३५ ते ४० कोटींची कमाई करेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 'सालार'चा सिनेमा हिंदी, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि तेलुगु भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा शाहरुखच्या 'डंकी'ला तगडी टक्कर देणार आहे.  

टॅग्स :प्रभाससेलिब्रिटीसिनेमा