विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना आज लग्नबंधनात अडकत आहेत. दोघं बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. उदयपूरमधील पॅलेसमध्ये त्यांचा आज शाही विवाहसोहळा आहे. 'विरोश' असं त्यांनी लग्नाच्या फंक्शन्सला नाव दिलं आहे. रश्मिका मंदाना ही नॉन फिल्मी बॅकग्राऊंडमधून आली आहे. तिच्या कुटुंबाविषयी खूप कमी जणांनी ऐकलं असेल. तिचे वडील आई वडील कोण आहेत आणि ते काय करतात वाचा.
रश्मिका मंदानाच्या वडिलांचं नाव मदन मंदाना आहे. कर्नाटकच्या विराजपेटमध्ये त्यांचं कॉफी इस्टेट आहे. तसंच त्यांचा स्वत:चा एक फंक्शन हॉलही आहे. तर रश्मिकाची आई सुमन मंगाना हाऊसवाईफ आहेत. रश्मिकाला एक छोटी बहीणही आहे जी तिच्याहून १६ वर्षांनी लहान आहे.
रश्मिका मंदाना आज कोट्यवधी कमावते. मात्र एक वेळ अशीही होती जेव्हा रश्मिकाचं कुटुंब आर्थिक तंगीत होतं. तेव्हा रश्मिका लहान होती. एका मुलाखतीत ती म्हणालेली की, "आम्ही आर्थिक तंगीचा सामना करत होतो. तेव्हा आम्हाला घर शोधणं आणि भाडं देणंही शक्य होत नव्हतं. मी बोर्डिंग स्कूलमध्ये होते. मी कायम एकटी एकटी असायचे. मला नीट स्वत:ला एक्सप्रेस करणंही जमत नव्हतं. मला कोणाशी मैत्रीही करता यायची नाही. तेव्हा माझी आई ढाल बनून आली. आईनेच मला प्रेरणा दिली. आई माझी सर्वात मोठी ताकद आहे."
Web Summary : Rashmika Mandanna, reportedly marrying Vijay Deverakonda, comes from a non-film background. Her father owns a coffee estate and a function hall in Karnataka. Her mother is a homemaker, and she has a sister 16 years younger. The family once faced financial difficulties, highlighting her mother's strength.
Web Summary : विजय देवरकोंडा से शादी करने वाली रश्मिका मंदाना गैर-फ़िल्मी पृष्ठभूमि से हैं। उनके पिता कर्नाटक में एक कॉफी एस्टेट और एक फंक्शन हॉल के मालिक हैं। उनकी माँ एक गृहिणी हैं, और उनकी एक बहन है जो 16 साल छोटी है। परिवार ने कभी वित्तीय कठिनाइयों का सामना किया, जिससे उनकी माँ की ताकत का पता चलता है।