Join us

'थलायवा' रजनीकांत निवृत्त होणार? 'या' सिनेमानंतर सिनेसृष्टीला निरोप देणार असल्याची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 17:21 IST

रजनीकांत यांच्या निवृत्तीची का होतेय चर्चा?

भारतीय सिनेमाचे सुपरस्टार रजनीकांत यांना चाहते 'थलायवा' असंच संबोधतात. नुकताच त्यांनी 'कुली' हा ब्लॉकबस्टर सिनेमा दिला. तर आता ते 'जेलर २'च्या शूटिंगमध्ये व्यग्र झाले आहेत. जेलरचा पहिला भाग तुफान गाजला होता. रजनीकांत यांची लोकप्रियता कमी झालेली नाही. आजही त्यांची युनिक स्टाईल, डायलॉगबाजी आणि अभिनय पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी होत असते. दरम्यान सर्वांचे हे फेवरेट अभिनेते काही वर्षात निवृत्त होणार आहेत. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रजनीकांत आता वाढतं वय आणि स्वास्थ्य संबंधी कारणांमुळे लवकरच रिटायरमेंट घेणार आहेत. सध्या त्यांचं वय ७५ आहे. याही वयात ते अॅक्टिव्ह आहेत. सिनेमांच्या शूटसाठी कित्येक ठिकाणी दौरे करत आहेत. 'जेलर','कुली','वेट्टाइया' सारखे हिट सिनेमे त्यांनी गेल्या दोन वर्षात दिले आहेत. त्यांचे आगामी सिनेमेही रांगेत आहेत. त्यात 'जेलर २'चा समावेश आहे. याशिवाय त्यांच्याकडे आणखी ४ सिनेमे आहेत. त्यातील एका सिनेमात ते कमल हासन यांच्यासोबत अनेक वर्षांनी स्क्रीन शेअर करणार आहेत. या सिनेमानंतर मात्र रजनीकांत सिनेसृष्टीतून निवृत्ती घेतील असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. 

काही दिवसांपूर्वीच रजनीकांत आणि कमल हासन यांनी त्यांच्या सिनेमाची घोषणा केली होती. हा सिनेमा कोण दिग्दर्शित करणार हे अद्याप ठरलेलं नाही. २०२७ साली या सिनेमाचं काम प्रत्यक्षात सुरु होईल. 'वलाईपेचु'च्या रिपोर्टनुसार, हा थलायवा रजनीकांत यांचा शेवटचा सिनेमा असणार आहे. तब्बल ३५ वर्षांनी रजनीकांत आणि कमल हासन एकत्र काम करणार आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Is 'Thalaiva' Rajinikanth Retiring? Rumors Swirl After Upcoming Film

Web Summary : Superstar Rajinikanth, fondly called 'Thalaiva,' may retire after his next film with Kamal Haasan due to age and health. He has delivered recent hits like 'Jailer' and 'Coolie'. The collaboration project starts in 2027; this could be his last film.
टॅग्स :रजनीकांतTollywood