Join us
Daily Top 2Weekly Top 5

'पुष्पाभाऊ' अल्लू अर्जून आणि 'गेम चेंजर' राम चरण यांच्यात सर्वात श्रीमंत कोण? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 15:28 IST

 'पुष्पाराज' अल्लू अर्जून आणि 'गेम चेंजर' राम चरण यांच्यात सर्वात श्रीमंत कोण? जाणून घ्या

Allu Arjun Vs Ram Charan: फिल्म इंडस्ट्रीमध्ये एकापेक्षा एक श्रीमंत असून आलिशान आयुष्य जगत असतात. कलाकारांच्या श्रीमंतीची नेहमीच तुलना झालेली दिसते. खास करुन टॉप कलाकारांची.  'पुष्पाराज' अल्लू अर्जून आणि 'गेम चेंजर' राम चरण हे या भारतातील टॉप श्रीमंत स्टार्सच्या यादीत येतात. पण, दोन्हींमध्ये कोणाची संपत्ती जास्त आहे? कोण अधिक श्रीमंत आहे? हे जाणून घेऊया. 

अल्लू अर्जून आणि राम चरण यांचा प्रचंड चाहता वर्ग आहे. दोन्ही कलाकारांची स्वतःची खासियत आहे. ज्येष्ठ अभिनेते चिरंजीवी यांचा मुलगा राम चरणने 'मगधीरा', 'रंगस्थलम' आणि जागतिक स्तरावर यशस्वी झालेला 'आरआरआर' सारखे चित्रपट दिलेत.  तर 'स्टायलिश स्टार' आणि 'आयकॉन स्टार' म्हणून प्रसिद्ध असलेला अल्लू अर्जुन हा 'आर्या', 'अला वैकुंठपुरमुलु' आणि 'पुष्पा' सारखे चित्रपट देत ट्रेंडसेटलर बनला आहे. एवढंच काय तर राष्ट्रीय पुरस्कारही त्यानं मिळवला आहे. 

संपत्तीच्या बाबतीत राम चरण पुढे आहे.  त्याची अल्लू अर्जुनपेक्षा जवळजवळ २.९ पट जास्त संपत्ती आहे. राम चरण सुमारे १३७० कोटींचा मालक आहे. तर अल्लू अर्जुनची एकूण संपत्ती अंदाजे ४६० कोटी रुपये आहे. पण, अल्लू अर्जुन हा भारतातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता बनला आहे.

फोर्ब्स इंडियाच्या मते, त्यानं 'पुष्पा २: द रुल'साठी ०० कोटी रुपये घेतले आहेत. तो देशातील सर्वात जास्त मागणी असलेल्या स्टारपैकी एक बनला आहे. तर राम चरणने 'आरआरआर'साठी ४५ कोटी रुपये घेतले होते. तर 'गेम चेंजर'साठी १०० कोटी रुपयांची मागणी केली होती. पण, चित्रपटाच्या निर्मितीचा व्याप पाहता त्यानं मानधन म्हणून ६५ कोटी रुपये घेतले. पण, तरीही 'गेम चेंजर' फ्लॉप झाला. आता चाहते दोघांच्याही नव्या प्रोजेक्टची वाट पाहात आहेत.

टॅग्स :अल्लू अर्जुनराम चरण तेजासेलिब्रिटी