Join us
Daily Top 2Weekly Top 5

अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 11:58 IST

'पुष्पा २'च्या ट्रेलरविषयी मोठी अपडेट समोर आली असून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे (pushpa 2)

 'पुष्पा २' सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. सुरुवातीपासून गाणी आणि पोस्टरमुळे सिनेमाची चांगलीच हवा आहे. 'पुष्पा २' रिलीज व्हायला आता एक महिन्यापेक्षा कमी अवधी राहिलाय. सिनेमाची आधीपासूनच लोकांमध्ये उत्सुकता ताणली गेलीय. अशातच 'पुष्पा २'च्या ट्रेलरविषयी मोठी अपडेट समोर आलीय. 'पुष्पा २'चा ट्रेलर किती लांबीचा असणार आणि ट्रेलर नेमका कधी आणि कोणत्या वेळी रिलीज होणार, याविषयी महत्वाची माहिती समोर आलीय. 

'पुष्पा २'चा ट्रेलरविषयी सर्व काही जाणून घ्या

'पुष्पा २'चा ट्रेलरविषयी महत्वाची माहिती सुरुवातीलाच सांगतो. सिनेमाचा ट्रेलर या रविवारी १७ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे सिनेमाचा ट्रेलर संध्याकाळी ६ वाजून ३ मिनिटांनी रिलीज होणार आहे. पाटणाला गांधी मैदान येथे 'पुष्पा २'चा ट्रेलर रिलीज होणार आहे. यावेळी सिनेमाची संपूर्ण स्टारकास्ट, दिग्दर्शक आणि सिनेमाची संपूर्ण टीम रिलीज होणार आहे. २ मिनिटं ४० सेकंदांचा हा ट्रेलर असणार आहे.

'पुष्पा २' सिनेमाविषयी

'पुष्पा २' सिनेमाविषयी सांगायचं तर ५ डिसेंबरला हा सिनेमा रिलीज होतोय. आधी हा सिनेमा या वर्षी स्वातंत्र्यदिनाला रिलीज होणार होता. परंतु अनेकदा सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. अखेर 'पुष्पा २'ची रिलीज डेट ५ डिसेंबरला जाहीर करण्यात आलीय. त्यामुळे २०२४ च्या अखेरीस 'पुष्पा २' बॉक्स ऑफिसवर धमाका करणार, अशी शक्यता नाकारता येत नाही. आता सर्वांना 'पुष्पा २'च्या ट्रेलरची उत्सुकता आहे. याशिवाय या सिनेमात समांथाऐवजी श्रीलीला आयटम सॉंगवर नाचताना दिसणार आहे.

टॅग्स :पुष्पाअल्लू अर्जुनरश्मिका मंदाना