'पुष्पा 2' सिनेमाची चांगलीच हवा आहे. अवघ्या तीन दिवसात अर्थात पाच डिसेंबरला सिनेमा रिलीज होतोय. गेल्या वर्षभरापासून पोस्टर, गाणी, टीझर, ट्रेलरमधून 'पुष्पा 2' ची चांगलीच क्रेझ मिळतेय. 'पुष्पा 2'मध्ये अल्लू अर्जुन पुन्हा एकदा पुष्पाच्या भूमिकेत खास स्वॅगमध्ये झळकतोय. तर रश्मिका श्रीवल्लीच्या भूमिकेत प्रेक्षकांचं मन जिंकतेय. 'पुष्पा 2'च्या तिकीटांची किंंमत गगनाला भिडली असताना सिनेमाचं तिकीट काही भागांमध्ये फक्त १०० रुपयांना मिळतंय. जाणून घ्या सविस्तर
'पुष्पा 2'चं तिकीट फक्त १०० रुपये
भारताची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये 'पुष्पा 2'चं तिकीट सर्वात महाग म्हणजेच १८०० रुपयांना विकलं जातंय. परंतु याच दिल्लीमध्ये काही भागांत 'पुष्पा 2'चं तिकीट अवघ्या १०० रुपयांना मिळतंंय. अर्थात ही ऑफर जास्त दिवसांसाठी नाहीय. दिल्लीमधील आयकॉनिक सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये 'पुष्पा 2' सिनेमाचं तिकीट १०० रुपयांपर्यंत स्वस्त करण्यात आलंय. दरियागंज येथील स्क्रीन डिलाईट थिएटरमध्ये फक्त ९५ रुपये तिकीट खरेदी करुन तुम्ही 'पुष्पा 2' बघू शकता.
याशिवाय डिलाईट सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये तिकीटांचा रेट ११० रुपये, अप्पर स्टॉलचा रेट १६० रुपये तर बाल्कनीचा रेट २३० रुपये आहे. याशिवाय सिंगल स्क्रीन अंबा सिनेमागृहामध्ये 'पुष्पा 2'चं तिकीट १३० रुपये आणि सर्वात जास्त रेट २२५ रुपये आहे. याचाच अर्थ दिल्लीतील अनेक सिंगल स्क्रीन थिएटर मालकांनी जास्तीत जास्त गर्दी व्हावी म्हणून 'पुष्पा 2'च्या तिकीटांचे दर कमी केलेत. मुंबईतील काही भागांत सकाळच्या मॅटिनी शोची तिकीट स्वस्त आहे.