'पुष्पा २'ची चर्चा सध्या जगभरात आहे. जगभरातले भारतीय आणि परदेशी चाहतेही 'पुष्पा २' पाहण्यासाठी थिएटर हाऊसफुल्ल करताना दिसत आहेत. 'पुष्पा २'ची रिलीजआधीपासूनच जोरदार चर्चा होती. 'किसीक', 'पिलिंग', 'मेरा सामी' ही गाणी चाहत्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतली. त्यातच अल्लू अर्जुनचा स्वॅग पुन्हा एकदा प्रेक्षकांना दिसून आला. याचाच परिणाम 'पुष्पा २'च्या कमाईवर होताना दिसतोय. 'पुष्पा २' रिलीज होऊन दोन दिवस झाले तोच सिनेमाने ४०० पार कमाई केलीय.
'पुष्पा २'ची कमाई ४०० पार
अल्लू अर्जुनचा मास एंटरटेनमेंट असलेला 'पुष्पा २' सिनेमा अवघ्या दोन दिवसात ४०० पार झालाय. कमाईच्या बाबतीत 'पुष्पा २'ने जगभरात ४०० कोटींचा आकडा ओलांडला आहे. १७४.९ कोटींची दमदार ओपनिंग करुन 'पुष्पा २'ने दोन दिवसात भारतात २६५ कोटींची कमाई केली. याशिवाय जगभरात 'पुष्पा २'ने ४०० कोटींचा आकडा पार केलाय. दुसऱ्या दिवशी कमाईत थोडी घट झाली असून 'पुष्पा २'ने ९० कोटी कमावले आहेत. परंतु शनिवार-रविवारी हा कमाईचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जातेय.
'पुष्पा २'ची चर्चा सर्वत्र
'पुष्पा २'ने कमाईच्या बाबतील राजामौलींच्या RRR सिनेमाचा विक्रम मोडलाय. RRR ने पहिल्या दिवशी १५६ कोटींची कमाई केलेली. त्यामुळे 'पुष्पा २' ओपनिंग डेच्या कमाईच्या बाबतीत RRR च्या पुढे गेलाय. आजवर कोणत्याही बॉलिवूड सिनेमालाही 'पुष्पा २' इतकी कमाई करता आली नाही. 'पुष्पा 2'च्या हिंदी वर्जनलाही प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद आहे. 'पुष्पा २' पुढील दिवसांमध्ये किती कमाई करतो, याची सर्वांना उत्सुकता आहे. अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना, फहाद फासिल यांची सिनेमात प्रमुख भूमिका आहे.