Join us

'पुष्पा २' पाहणाऱ्या प्रेक्षकांची मोठी फसवणूक! मध्यांतरानंतरचा सिनेमा आधी दाखवला; कुठे घडला हा प्रकार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 11:27 IST

'पुष्पा २' पाहण्यासाठी गेलेल्या प्रेक्षकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागलाय. काय घडलाय नेमका प्रकार

'पुष्पा २' सिनेमा काहीच दिवसांपूर्वी रिलीज झालाय. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केलीय. 'पुष्पा २' सिनेमात पुन्हा एकदा अल्लू अर्जुन, रश्मिका मंदानाची रोमँटिक केमिस्ट्री दिसतेय. 'पुष्पा २' पाहायला थिएटरमध्ये प्रचंड गर्दी होताना दिसतेय. ३ तास २१ मिनिटांचा हा सिनेमा अनेकांना आवडतोय. परंतु 'पुष्पा २' पाहायला गेलेल्या प्रेक्षकांची मोठी फसवणूक झाल्याचं समजतंय. 'पुष्पा २' पाहायला गेलेल्या प्रेक्षकांना मध्यांतराआधीचा सिनेमा आधी दाखवण्यात गेल्याने संतप्त प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.

'पुष्पा २' पाहायला गेलेल्या चाहत्यांची फसवणूक

'पुष्पा २' पाहायला गेलेल्या प्रेक्षकांना मनस्ताप सहन करावा लागलाय. झालं असं की, कोच्ची येथील सिनेपोलिस थिएटरमध्ये 'पुष्पा २'चा इंटर्व्हल नंतरचा भाग सुरुवातीला दाखवण्यात आला. ही घटना घडल्यावर प्रेक्षकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार शुक्रवारी संध्याकाळी प्रेक्षक सिनेमा पाहायला बसले होते. जेव्हा इंटर्व्हलची वेळ आली तेव्हा सिनेमाचे एंड क्रेडीट्स सुरु झाले. तेव्हा प्रेक्षकांना लक्षात आलं की त्यांना मध्यांतरानंतरचा भाग सुरुवातीला दाखवण्यात आला.

प्रेक्षकांनी तिकीटाचे पैसे परत करण्याची केली मागणी

या गडबडीत प्रेक्षकांमध्ये चांगलीच निराशा दिसून आली. काही प्रेक्षकांनी थिएटर स्टाफकडून पैसे परत देण्याची मागणी केली. याशिवाय काहींनी सिनेमाच्या इंटर्व्हल आधीच्या भागाला पुन्हा बघण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर जे प्रेक्षक या गडबडीनंतरही थिएटरमध्ये थांबले होते त्या १० प्रेक्षकांना सिनेपोलिस थिएटरने सिनेमाचा पहिला हाफ पुन्हा दाखवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान 'पुष्पा २' सध्या हाउसफुल्ल गर्दीत सुरु आहे.

टॅग्स :पुष्पारश्मिका मंदानाअल्लू अर्जुन