Join us
Daily Top 2Weekly Top 5

Pushpa 2 : अल्लू अर्जुनच्या सिनेमाला ब्रेक! १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार नाही 'पुष्पा २'? मोठी अपडेट समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 12:04 IST

३ वर्षांनी 'पुष्पा २' प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. १५ ऑगस्ट रोजी हा सिनेमा रिलीज होणार होता. परंतु, आता सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात येणार असल्याची चर्चा रंगली आहे. 

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' सिनेमाने सगळ्यांनाच वेड लावलं होतं. २०२१ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाची सर्वत्र क्रेझ होती. या सिनेमातील डायलॉग तुफान व्हायरल झाले होते. तर अल्लू अर्जुनच्यापुष्पा स्टाइलची चाहत्यांना भुरळ पडली होती. 'पुष्पा' नंतर या सिनेमाच्या सीक्वलच्या प्रतिक्षेत प्रेक्षक होते. ३ वर्षांनी 'पुष्पा २' प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. १५ ऑगस्ट रोजी हा सिनेमा रिलीज होणार होता. परंतु, आता सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात येणार असल्याची चर्चा रंगली आहे. 

'पुष्पा २' सिनेमाचं एडिटिंगचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे हा सिनेमा १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार की नाही, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. 'पुष्पा २'चे निर्माते असलेले एंटनी रुबेन फिल्म एडिटिंगचंही काम करत आहेत. 'पुष्पा २'बरोबरच वरुण धवनचा बेबी जॉन सिनेमादेखील त्यांच्याच हातात आहे. त्यामुळे 'पुष्पा २'च्या एडिटिंगसाठी त्यांना पुरेसा वेळ देता येत नसल्याचं सांगितलं जात आहे. 'पुष्पा २'मधील आतापर्यंत दोन गाणी प्रदर्शित करण्यात आली आहेत. मात्र ही गाणीदेखील लिरिकल होती. एडिटिंग पूर्ण न झाल्यामुळेच लिरिकल गाणी प्रदर्शित करण्यात आल्याचंही म्हटलं जात आहे. 

सिनेमाची रिलीज डेट खरंच पुढे ढकलण्यात येत आहे का? याबाबत अद्याप 'पुष्पा २'च्या टीमकडून कोणतीही अधिकृता माहिती दिली गेलेली नाही. बॉलिवूड हंगामाने दिलेल्या रिपोर्टनुसार, 'पुष्पा २' सिनेमाच्या रिलीज डेटबाबत मेकर्स लवकरच निर्णय घेऊन याबाबत अपडेट देणार आहेत. 

'पुष्पा २'च्या प्रदर्शनाआधीच त्यातील गाण्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. 'पुष्पा २' सिनेमाचा टीझर आणि त्यातील गाण्यांमुळे सिनेमाबाबत चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. पण, आता चाहत्यांना 'पुष्पा २'साठी आणखी थोडी वाट बघावी लागणार आहे. 

टॅग्स :पुष्पाअल्लू अर्जुनरश्मिका मंदाना