Join us
Daily Top 2Weekly Top 5

Pushpa 2: रिलीजआधीच 'पुष्पा २'ने अमेरिकेत रचला रेकॉर्ड, अल्लू अर्जुनच्या सिनेमाच्या हजारो तिकिटांची विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 17:39 IST

५ डिसेंबरला पुष्पा सर्वत्र प्रदर्शित होत आहे. पण, प्रदर्शनाआधीच अल्लू अर्जुनच्या सिनेमाने रेकॉर्ड केला आहे. 

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत असलेल्या 'पुष्पा २'सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. २०२१ साली प्रदर्शित झालेल्या पुष्पाने चाहत्यांना वेड लावलं होतं. तेव्हापासून या सिनेमाच्या सीक्वलच्या प्रेक्षक प्रतिक्षेत होते. त्यामुळेच 'पुष्पा २'ची घोषणा झाल्यानंतर चाहते उत्सुक होते. अखेर चाहत्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे. ५ डिसेंबरला पुष्पा सर्वत्र प्रदर्शित होत आहे. पण, प्रदर्शनाआधीच अल्लू अर्जुनच्या सिनेमाने रेकॉर्ड केला आहे. 

'पुष्पा २' हा या वर्षीचा सर्वाधिक प्रतिक्षेत असलेला सिनेमा आहे. २०२१ साली या सिनेमाचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. तेव्हादेखील या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कामगिरी केली होती. आता प्रदर्शनाआधीच 'पुष्पा २'ची क्रेझ चाहत्यांमध्ये पाहायला मिळत आहे. केवळ भारतातच नाही तर परदेशातही या सिनेमाची चांगलीच क्रेझ आहे. सिनेमा प्रदर्शित होण्यासाठी महिना असताना अमेरिकेत मात्र 'पुष्पा २'च्या हजारो तिकिटांची विक्री झाली आहे.

 

अमेरिकेत 'पुष्पा २' ४ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगमधून तब्बल १५ हजार तिकिटे विकली गेली आहे. अमेरिकेत एवढ्या लवकर १५ हजार तिकिटे विकली जाणारा 'पुष्पा २' हा पहिला भारतीय सिनेमा ठरला आहे. यातून सिनेमाने तब्बल ५०० कोटी डॉलरची कमाई केली आहे. याबाबत पुष्पाच्या मेकर्सकडून माहिती देण्यात आली आहे. 

दरम्यान, 'पुष्पा २'च्या प्रदर्शनाआधीच त्यातील गाण्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. 'पुष्पा २' सिनेमाचा टीझर आणि त्यातील गाण्यांमुळे सिनेमाबाबत चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता प्रेक्षक ट्रेलरच्या अपेक्षित असून लवकरच सिनेमाचा ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :अल्लू अर्जुनपुष्पारश्मिका मंदाना