Join us

प्रियांका चोप्राच्या बहिणीला दिग्दर्शकाने अचानक केलं KISS, आधी हसली अन् मग... (Video)

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 13:24 IST

मन्रारा चोप्रा 'थिरागबदरा सामी' सिनेमाच्या प्रमोशनसाठी एका इव्हेंटमध्ये पोहोचली.

देसी गर्ल प्रियंका चोप्राची (Priyanka Chopra) बहीण मन्नारा चोप्रा (Mannara Chopra) आगामी 'थिरागबदरा सामी' सिनेमामुळे चर्चेत आहे. ती सध्या जोरदार सिनेमाचं प्रमोशन करत आहे. दरम्यान तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. प्रमोशनल इव्हेंटमध्ये स्टेजवर सिनेमाचे दिग्दर्शक तिच्या गालावर अचानक किस करतात. यानंतर ती शॉक होते. तिच्या संमतीशिवाय तिला किस केल्याने नेटकऱ्यांनी दिग्दर्शकाला ट्रोल केलं आहे.  तिचा हाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

मन्रारा चोप्रा 'थिरागबदरा सामी' सिनेमाच्या प्रमोशनसाठी एका इव्हेंटमध्ये पोहोचली. यावेळी ती दिग्दर्शक ए.एस.रविकुमार यांच्यासोबत पोज देत होती. तेव्हा दिग्दर्शक कॅमेऱ्यासमोरच तिच्या गालावर किस करताना दिसतात.  असं काही होईल याची कल्पनाही अभिनेत्रीला नव्हती. तिच्या चेहऱ्यावर शॉक झाल्याची प्रतिक्रिया दिसत होती. पण तिने हसतच परिस्थिती सांभाळली. मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर काही क्षणात व्हायरल झाला. दिग्दर्शक ट्रोल होऊ लागला.

या व्हिडिओनंतर अभिनेत्री प्रतिक्रिया देताना म्हणाली,'हे सगळं अचानक झालं. माझ्या सिनेमाच्या प्रमोशनवेळी असं काही होईल याची मला कल्पना नव्हती. याबद्दल फार काही बोलू नका ही विनंती. मी याहून जास्त काही बोलू शकत नाही.'

मन्नारा चोप्रा ही प्रियंका आणि परिणिती चोप्राची चुलत बहीण आहे. ती साऊथ इंडस्ट्रीत सक्रिय आहे. 2014 साली तिने तेलुगू सिनेमा 'प्रेमा गीमा जंथा नाई' मधून पदार्पण केलं. यानंतर तिने 'जिद' 'संदामारुथम', 'जक्कन्ना' सारख्या सिनेमात काम केलं. तिला शेवटचं ल २०१९ साली आलेल्या 'सीता'  सिनेमात पाहिलं गेलं. आता तिचा 'थिरागबदरा' सिनेमा प्रदर्शित होतोय. 
टॅग्स :प्रियंका चोप्रासिनेमासोशल मीडियासोशल व्हायरलट्रोल