Nayanthara Buys A Luxury Duplex : दक्षिण भारतीय चित्रपटांमधील 'लेडी सुपरस्टार' नयनतारा सध्या तिच्या आगामी चित्रपटामुळेच नाही, तर एका आलिशान रिअल इस्टेट गुंतवणुकीमुळे चर्चेत आली आहे. नयनताराने चेन्नईतील सर्वात प्रतिष्ठित आणि हाय-प्रोफाइल समजल्या जाणाऱ्या 'पोएस गार्डन' भागात तब्बल ३१.५ कोटी रुपयांचा एक भव्य डुप्लेक्स खरेदी केला आहे.
नयनताराचा हा डुप्लेक्स तेनमपेटमधील 'लेगसी रेसिडेन्शियल प्रोजेक्ट'च्या चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर स्थित आहे. १५ डिसेंबर २०२५ रोजी या घराची नोंदणी झाली असून त्याचे एकूण बिल्ट-अप क्षेत्रफळ १४,३६९ चौरस फूट इतके विशाल असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, या घरात आठ कार पार्किंगची सोय आहे. कागदपत्रांनुसार, या मालमत्तेत नयनताराचा ९० टक्के वाटा असून तिचा पती आणि दिग्दर्शक विघ्नेश शिवनचा १० टक्के हिस्सा आहे.
रजनीकांत आणि धनुष झाले शेजारीपोएस गार्डन हे चेन्नईतील असे ठिकाण आहे, जिथे दिग्गज लोक राहतात. नयनतारा आता दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि अभिनेता धनुष यांची शेजारी झाली आहे. धनुषने २०२४ मध्ये याच भागात १५० कोटी रुपयांचा बंगला खरेदी केला होता.
नयनतारा किती कोटींची मालकीण?
नयनताराची एकूण संपत्ती २०० कोटी रुपयांच्या घरात आहे. तिने केवळ रिअल इस्टेटमध्येच सुमारे १०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. चेन्नई व्यतिरिक्त हैदराबादच्या बंजारा हिल्समध्ये तिची प्रत्येकी १५ कोटींची दोन घरे आहेत, तर केरळमध्येही तिची अनेक ठिकाणी मालमत्ता आहे. सध्या ती एका चित्रपटासाठी सुमारे १८ ते २० कोटी रुपये मानधन घेते.
आगामी प्रोजेक्टनयनतारा सध्या प्रोफेशनल लाईफमध्येही प्रचंड व्यस्त आहे. तिचे नऊ चित्रपट एकापाठोपाठ एक प्रदर्शित होण्यासाठी रांगेत आहेत. यात मुकुठी अम्मान २, हाय, रक्कयी, एनबीके १११, आणि कन्नड चित्रपट टॉक्सिक यांचा समावेश आहे. या वर्षी तिचे तीन मल्याळम चित्रपटही पॅन इंडिया स्तरावर प्रदर्शित होणार आहेत.
Web Summary : Nayanthara purchased a ₹31.5 crore duplex in Chennai's Poes Garden. The 14,369 sq ft property, registered on December 15, 2025, makes her neighbors with Rajinikanth and Dhanush. She owns 90% share, while her husband Vignesh Shivan owns 10%. Her total net worth is approximately ₹200 crore.
Web Summary : नयनतारा ने चेन्नई के पोएस गार्डन में ₹31.5 करोड़ का डुप्लेक्स खरीदा। 14,369 वर्ग फुट की संपत्ति, 15 दिसंबर, 2025 को पंजीकृत, उन्हें रजनीकांत और धनुष का पड़ोसी बनाती है। उनका 90% हिस्सा है, जबकि उनके पति विग्नेश शिवन का 10%। उनकी कुल संपत्ति लगभग ₹200 करोड़ है।