Join us

समांथाशी घटस्फोटानंतर ३ वर्षांतच नागा चैतन्य पुन्हा संसार थाटणार? बॉलिवूड अभिनेत्रीबरोबर साखरपुड्याच्या चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 09:41 IST

समांथा रुथ प्रभूशी घटस्फोट घेतल्यानंतर आता नागा चैतन्य पुन्हा बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहे. नागा चैतन्य बॉलिवूड अभिनेत्रीबरोबर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचंही म्हटलं जात आहे.

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता नागा चैतन्य करिअरपेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत असतो. समांथा रुथ प्रभूशी घटस्फोट घेतल्यानंतर आता नागा चैतन्य पुन्हा बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहे. नागा चैतन्य बॉलिवूड अभिनेत्रीबरोबर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचंही म्हटलं जात आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून शोभिता धुलिपाला आहे. 

नागा चैतन्य आणि शोभिता गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉटही करण्यात आलं आहे. पण, त्यांनी अद्याप त्यांचं रिलेशनशिप जाहीर केलेलं नाही. आता नागा चैतन्य आणि शोभिता त्यांच्या प्रेमाच्या प्रवासात एक पाऊल पुढे टाकत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, गुरुवारी(८ ऑगस्ट) नागा चैतन्य आणि शोभिता यांचा साखरपुडा होणार आहे. नागा चैतन्यच्या घरातच त्यांच्या साखरपु्ड्याचा समारंभ होणार असल्याची माहिती मिळत आहे. याबाबत अद्याप नागा चैतन्य किंवा शोभिताने कोणतीही माहिती दिलेली नाही. पण, साखरपुडा केल्यानंतर सोशल मीडियावरुन ते दोघेही ही बातमी चाहत्यांबरोबर शेअर करणार असल्याचं सांगितलं जात आहे. 

दरम्यान, नागा चैतन्य आणि समांथाने २०१७ मध्ये मोठ्या थाटामाटात लग्न केलं होतं. पण, लग्नानंतर काही वर्षांतच घटस्फोट घेत ते वेगळे झाले. २०२१ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतल्याचं जाहीर केलं होतं. समांथा आणि नागा चैतन्यकडे साऊथ सिनेसृष्टीतील आदर्श कपल म्हणून पाहिलं जायचं. त्यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. 

टॅग्स :Tollywoodसमांथा अक्कीनेनीसेलिब्रिटी