Join us

बॉलिवूड अभिनेत्रीबरोबर व्हॅकेशनला गेला नागा चैतन्य; युरोपमध्ये झाला स्पॉट, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 16:33 IST

समांथापासून वेगळं झाल्यानंतर नागा चैतन्य बॉलिवूड अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. आता पुन्हा नागा चैतन्याला स्पॉट करण्यात आलं आहे.

नागा चैतन्य आणि समांथा रुथ प्रभू ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी होती. परंतु, काही कारणांमुळे ते एकमेकांपासून वेगळे झाले. समांथापासून वेगळं झाल्यानंतर नागा चैतन्य बॉलिवूड अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. आता पुन्हा नागा चैतन्याला स्पॉट करण्यात आलं आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून शोबिता धुलिपाला आहे. 

सध्या नागा चैतन्य शोबिता धुलिपालासोबत युरोपमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. युरोपमधील एका रेस्टॉरंटमध्ये नागा चैतन्य आणि शोबिता धुलिपालाला एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. त्यांचा रेस्टॉरंटमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इन्स्टंट बॉलिवूड या पापाराझी पेजवरुन नागा चैतन्य आणि शोबिता धुलिपालाचा फोटो शेअर करण्यात आला आहे.

शोबिता धुलिपाला आणि नागा चैतन्या गेल्या काही वर्षांपासून डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. त्या दोघांनाही अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. मात्र अद्याप दोघांपैकी कोणीही त्यांचं रिलेशनशिप ऑफिशियल केलेलं नाही. अफेअरच्या चर्चांवरही नागा चैतन्य आणि शोबिता मौन बाळगून आहेत. 

नागा चैतन्य आणि समांथाने २०१७ मध्ये लग्न केलं होतं. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आदर्श कपल म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. लग्नानंतर ३ वर्षांनी घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले. त्यांच्या घटस्फोटामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. नागा चैतन्यपासून विभक्त झाल्यानंतर समांथा सध्या सिंगल आहे.  

टॅग्स :Tollywoodसेलिब्रिटी