Join us

लग्नाच्या २४ वर्षांनी प्रसिद्ध अभिनेत्रीचा घटस्फोट, नवऱ्याने युट्यूब चॅनलवरुन दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 12:57 IST

मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्रीचा लग्नाच्या २४ वर्षानंतर घटस्फोट झालाय

मल्याळम मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री मंजू पिल्लई यांचा घटस्फोट झालाय. प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर सुजित वासुदेवसोबत मंजू यांनी घटस्फोट केलाय. मंजू आणि सुजीत यांच्या लग्नाला २४ वर्ष पूर्ण झाली आहेत. सुजीत यांनी त्यांच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घटस्फोटाची घोषणा केली. २०२० पासूनच मंजू आणि सुजीत एकमेकांपासून वेगळे राहत होते. अखेर गेल्या महिन्यात त्यांची घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाली

युट्यूब व्हिडिओमध्ये सुजीत वासुदेव यांनी सांगितले की 2020 पासून त्यांची पत्नी मंजूपासून ते वेगळे राहत होते. परंतु घटस्फोटाची प्रक्रिया गेल्या महिन्यात पूर्ण झाली. घटस्फोटानंतर तो मंजूशी चांगली मैत्री ठेवण्याचा प्रयत्न करेल. मुलाखतीत त्यांनी मंजूच्या करिअरच्या प्रगतीचंही कौतुक केलं. याशिवाय घटस्फोट झाल्यावरही मैत्री कायम असेल आणि मंजूच्या करिअरला माझा कायम सपोर्ट असेल, असंही सुजीत म्हणाले.

मंजू पिल्लई आणि सुजित वासुदेव यांचे 2000 मध्ये लग्न झाले आणि त्यांना दया नावाची मुलगी आहे. त्यांच्या घटस्फोटाच्या अफवा आत्तापर्यंत गेल्या अनेक दिवसांपासून फिरत होत्या. अखेर या अफवा खऱ्या असल्याचं स्पष्ट झालंय सुजितने 'दृष्यम' आणि 'लुसिफर'सह काही लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले. मंजू यांनीही विविध मल्याळी टेलिव्हिजन शोमध्ये सक्रियपणे सहभागी आहे.

टॅग्स :Tollywoodमराठी