Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mahavtar Parshuram: 'महावतार नरसिंह'च्या यशानंतर 'महावतार परशुराम'ची घोषणा; अंगावर काटा आणणारी पहिली झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 17:08 IST

'महावतार' सिनेमॅटिक युनिव्हर्समधील दुसरा चित्रपट 'महावतार परशुराम' चा पहिला अधिकृत मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. 'महावतार परशुराम'ची पहिली झलक पाहून प्रेक्षकांच्या अंगावर काटा आला आहे.

'कांतारा' आणि 'केजीएफ' सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट देणाऱ्या होम्बले फिल्म्स (Hombale Films) ने परशुराम जयंतीचे औचित्य साधून आपल्या आगामी भव्य चित्रपटाची घोषणा केली आहे. 'महावतार' सिनेमॅटिक युनिव्हर्समधील दुसरा चित्रपट 'महावतार परशुराम' चा पहिला अधिकृत मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. 'महावतार परशुराम'ची पहिली झलक पाहून प्रेक्षकांच्या अंगावर काटा आला आहे.

काही महिन्यांपूर्वी होम्बले फिल्म्सचा 'महावतार नरसिंह' सिनेमा रिलीज झाला होता. ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता भगवान परशुराम यांच्या जीवनावर आधारित 'महावतार परशुराम' या चित्रपटाची घोषणा करून त्यांनी हे पौराणिक विश्व अधिक विस्तारले आहे. समोर आलेल्या पोस्टरमध्ये भगवान परशुराम यांचे तेजस्वी आणि आक्रमक रूप पाहायला मिळत असून, हा चित्रपट भारतीय संस्कृती आणि पौराणिक कथांचा एक अद्भुत संगम असेल.

 हा चित्रपट अत्यंत भव्य स्तरावर तयार केला जाणार आहे. उत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स आणि जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान वापरून भगवान परशुराम यांची कथा मोठ्या पडद्यावर मांडली जाईल. होम्बले फिल्म्सने नेहमीच आशयघन आणि भव्य चित्रपटांची निर्मिती केली आहे, त्यामुळे 'महावतार' सिनेमांच्या सीरिजबद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. भगवान परशुराम हे न्याय आणि पराक्रमाचे प्रतीक मानले जातात, त्यामुळे त्यांची गाथा रुपेरी पडद्यावर कशी साकारली जाते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Mahavtar Parshuram Announced: First Glimpse of the Awe-Inspiring Epic

Web Summary : Hombale Films unveils 'Mahavtar Parshuram' after 'Mahavtar Narasimha' success. The motion poster reveals Lord Parshuram's fierce form, promising a blend of Indian culture and mythology with visual effects. This film expands the 'Mahavtar' cinematic universe.
टॅग्स :Tollywoodपरशुराम मंदिर