Mahavatar Narsimha Ott Release: सध्या बॉक्स ऑफिसवर 'महावतार नरसिंह' सिनेमाची (Mahavatar Narsimha) चांगलीच हवा आहे. हा सिनेमा म्हणजे. अॅनिमेटेड असलेला हा सिनेमा लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना पसंत पडला आहे. 'महावतार नरसिंह' पाहायला प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. भगवान विष्णुच्या नरसिंह अवतारावर हा सिनेमा आधारीत आहे. 'महावतार नरसिंह' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रिलीज झालेल्या बिग बजेट सिनेमांना मागे सोडलं आहे. थिएटरनंतर हा सिनेमा कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणि कधी येणार, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. यावर आता चित्रपटाच्या निर्मात्यांनी अधिकृत निवेदन जारी करून माहिती दिली आहे.
दिग्दर्शक अश्विन कुमार यांचा अॅनिमेटेड 'महावतार नरसिंह'चा ओटीटीसंदर्भात कोणताही करार अद्याप झालेला नाही. क्लीम प्रॉडक्शनने त्यांच्या अधिकृत X (पूर्वीचे ट्विटर) हँडलवरून पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, 'महावतार नरसिंह' आणि त्याच्या ओटीटी प्रदर्शनाबद्दलची चर्चा आम्हाला समजली. पण आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की सध्या हा चित्रपट फक्त चित्रपटगृहांमध्येच प्रदर्शित होत आहे. ओटीटीसंदर्भात कोणताही करार अद्याप अंतिम झालेला नाही. अफवांपासून दूर राहा! फक्त अधिकृत अपडेट्सवर विश्वास ठेवा", असं त्यांनी म्हटलं. ०
'महावतार नरसिंह' २५ जुलै रोजी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट पाच भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित झाला. शिल्पा धवन, कुशल देसाई आणि चैतन्य देसाई यांनी क्लेम प्रॉडक्शनच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 'महावतार नरसिंह' हा होम्बाले फिल्म्स आणि क्लेम प्रॉडक्शनच्या 'दशावतार' फ्रँचायझीतील पहिला अॅनिमेशनपट आहे. भगवान विष्णूच्या दहा अवतारांवर आधारित असलेल्या या फ्रँचायझीतील चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.
'महावतार नरसिंह'नंतर 'महावतार परशुराम' पुढील वर्षी २०२७ मध्ये प्रदर्शित होणार आहे. यानंतर 'महावतार रघुनंदन' २०२९ मध्ये, 'महावतार धवकादेश' २०३१ मध्ये, 'महावतार गोकुळानंद' २०३३ मध्ये, 'महावतार कल्की भाग 1' २०३५ मध्ये आणि 'महावतार कल्की भाग २' हा २०३७ मध्ये रिलीज होणार आहे.