सुपरस्टार ऋषभ शेट्टीचा (Rishab Shetty) बहुप्रतिक्षित ॲक्शन-मायथोलॉजिकल चित्रपट 'कांतारा चॅप्टर १' (Kantara Chapter 1) आज दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. पहिल्या भागाला मिळालेल्या प्रचंड यशानंतर, प्रेक्षक 'कांतारा'च्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत होते. आता चित्रपट पाहिल्यानंतर नेटिझन्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर आपला जोरदार प्रतिसाद देत आहेत.
'कांतारा चॅप्टर १' पाहून प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 'कांतारा चॅप्टर १' पाहून प्रेक्षक सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत. अनेक युजर्सनी हा चित्रपट 'जबरदस्त सिनेमॅटिक अनुभव' आणि 'अनोखं कथा' (divine storytelling) असल्याचं म्हटलं आहे.
नेटिझन्सच्या प्रतिक्रिया:
एका युजरने लिहिले, "या त्सुनामीला कोणी रोखू शकत नाही! 'कांतारा चॅप्टर १' - दैवी आणि अनोखी कथा, भन्नाट अभिनय आणि जबरदस्त सिनेमॅटिक अनुभव."
दुसऱ्या एका युजरने ऋषभ शेट्टीची प्रशंसा करताना म्हटलं, "एवढा मोठा प्रोजेक्ट इतक्या आत्मविश्वासाने आणि पूर्णत्वाने पडद्यावर आणणं, त्याच वेळी अभिनय करणं ही लहान गोष्ट नाही. पडद्यावर चित्रपटाचा उच्च स्तर आणि निर्मितीचे मूल्य स्पष्टपणे दिसते."
काही युजर्सनी चित्रपटाची व्हिज्युअल्स (दृश्ये) अतिशय आकर्षक असल्याचं म्हटलं आहे, पण त्याचबरोबर काहींना हा सिनेमा पहिल्या भागापेक्षा इतका चांगला नाही, असंही म्हटलं आहे.
'कांतारा चॅप्टर १' हा मायथोलॉजिकल-ॲक्शन चित्रपट ऋषभ शेट्टीने दिग्दर्शित केला आहे. ऋषभनेच या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. चित्रपटाची भव्यता, कथाआणि ऋषभ शेट्टीच्या अभिनयाचे प्रेक्षक तोंडभरून कौतुक करत आहेत. एकूणच 'कांतारा चॅप्टर १' सिनेमा बॉक्स ऑफिसवर वादळ आणणार, यात शंका नाही
Web Summary : Rishab Shetty's 'Kantara Chapter 1' receives positive reactions. Netizens praise the divine storytelling and cinematic experience. Some find the visuals stunning, while others feel it falls short of the first film. Shetty's performance and the film's scale are widely appreciated.
Web Summary : ऋषभ शेट्टी की 'कांतारा चैप्टर 1' को सकारात्मक प्रतिक्रिया मिल रही है। नेटिज़न्स दिव्य कहानी और सिनेमाई अनुभव की प्रशंसा करते हैं। कुछ को दृश्य शानदार लगते हैं, जबकि अन्य को लगता है कि यह पहली फिल्म से कम है। शेट्टी के प्रदर्शन और फिल्म के पैमाने की व्यापक रूप से सराहना की जाती है।