Join us

ब्राह्मण असून २ लग्न का केली? अभिनेत्याचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाला- "रामाच्या वडिलांच्या ३ बायका होत्या..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 14:43 IST

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेत्याने लग्नाबद्दल बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

कमल हसन हे सिनेसृष्टीतील मोठं नाव आहे. साऊथ सिनेसृष्टी गाजवणाऱ्या कमल हसन यांचा हिंदीतही मोठा चाहता वर्ग आहे. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलेले आणि 'चाची ४२०' या सिनेमामुळे विशेष लोकप्रियता मिळवलेले कमल हसन हे ठग लाइफ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या सिनेमाच्या प्रमोशन निमित्ताने ते अनेक ठिकाणी मुलाखतीही देत आहेत. सिनेमाच्या प्रमोशन इव्हेंटमध्ये पत्रकराने विचारलेल्या लग्नाबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देताना कमल हसन यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. 

'ठग लाइफ' सिनेमाच्या प्रमोशन इव्हेंटमध्ये सिनेमात मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री त्रिशा कृष्णन हिला लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अभिनेत्रीने "लग्न झालं तरी ठीक किंवा नाही झालं तरी ठिक", असं उत्तर दिलं. लग्नाबद्दल बोलताना कमल हसन यांची जीभ मात्र घसरली. या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, "ही १०-१५ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझ्या एका जवळच्या मित्राने मला विचारलं होतं की एका चांगल्या ब्राह्मण कुटुंबातील असूनही तू २ वेळा लग्न का केलंस? त्यावर मी त्याला विचारलं होतं की लग्नाचा आणि कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा काय संबंध?". 

ते पुढे म्हणाले, "त्यावर माझा मित्र म्हणाला की तुम्ही तर प्रभू श्रीराम यांची पूजा करता. तेव्हा मी त्याला म्हटलं की पहिलं गोष्ट तर मी कोणत्याही देवाची पूजा करत नाही. मी प्रभू श्री रामाचं अनुकरण करत नाही. मला वाटतं मी त्यांचे वडील दशरथ यांना फॉलो करतो ज्यांच्या ३ बायका होत्या". 

कमल हसन यांनी १९७८ मध्ये वाणी गणपति यांच्याशी लग्न केलं होतं. लग्नाच्या १० वर्षांनी घटस्फोट घेत ते वेगळे झाले. त्यानंतर त्यांनी सारिका यांच्यासोबत विवाह केला होता. त्यांना दोन मुली आहेत. पण, कमल हसन यांचं हे लग्नही टिकलं नाही. २००४ मध्ये घटस्फोट घेत ते सारिका यांच्यापासून वेगळे झाले. 

टॅग्स :कमल हासनसेलिब्रिटी