Join us
Daily Top 2Weekly Top 5

Jr.NTR च्या चाहत्यांचा तुफान राडा! अभिनेत्याला पाहण्यासाठी रुग्णालयात घुसले, एस्केलेटर तोडले अन्...; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 12:04 IST

एस्केलेटर तोडले अन्...;'या'अभिनेत्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी केली तोबा गर्दी, पोलिसांनी केला लाठीमार, कारण काय?

Jr.NTR Viral Video : दक्षिण चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अभिनेत्यांपैकी एक नाव म्हणजे ज्युनियर एनटीआर.तो अनेकदा त्याचे चित्रपट आणि अभिनयामुळे चर्चेत असतो. अभिनेत्याचा साऊथसह  संपूर्ण देशभरात मोठा चाहतावर्ग आहे.ज्युनियर एनटीआरची केवळ एक झलक पाहण्यासाठी चाहते प्रचंड आतुर असतात. सध्या अभिनेत्याचा असाच एक व्हिडीओ सोशल मिडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये अभिनेत्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आणि गोंधळ निर्माण झाला. ही परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. नेमकं काय घडलं? जाणून घेऊया...

एखादा कलाकाराला पाहण्यासाठी गर्दी जमणं ही गोष्ट काही नवीन नाही. मात्र, अशामुळे अनेक गंभीर घटनाही झाल्या आहेत. अलिकडेच ८ मार्च रोजी ज्युनियर एनटीआर बंगळुरुतील 'किम्स' सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी पोहोचला होता. अभिनेता रुग्णालयात पोहोचल्याची माहिती मिळताच तिथे लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली, ज्यामुळे बराच गोंधळ उडाला. ज्युनिअर एनटीआरची एन्ट्री होताच चाहत्यांनी सुरक्षाकडं तोडून आत शिरण्याचा प्रयत्न केला.

ज्युनियर एनटीआर  चाहत्यांनी रुग्णालयाच्या आवारात घुसून धुडगूस घातला तसेच सुरक्षेसाठी ठेवलेले एस्केलेटरही तोडल्याची धक्कादायक माहिती मिळतेय. या सगळ्या घडल्या प्रकारामुळे रुग्णालयातील मालमत्तेचं मोठं नुकसान झालं. या गोंधळामुळं रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

मिडिया रिपोर्टनुसार,  जेव्हा परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली  तेव्हा पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आणि परिसर रिकामा करण्यासाठी लाठीचार्जही करावा लागला.या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हाय होत असून अनेक लोकांनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.या व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका यूजरने म्हटलंय,"जगातील सर्वात वाईट फॅन्डम," तर दुसऱ्याने लिहिलंय,"रुग्णालयातील हा गोंधळ चुकीचा आहे." अशा प्रकारे कमेंट करत,नेटकरी या चाहत्यांच्या वर्तवणूकीबद्दल निराशा व्यक्त करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Jr. NTR's fans riot to see him, damage hospital.

Web Summary : Jr. NTR's fans caused chaos at a Bengaluru hospital during his visit. They broke escalators, leading to property damage. Police used a lathi charge to control the crowd, sparking online outrage.
टॅग्स :ज्युनिअर एनटीआरTollywoodसेलिब्रिटीबेंगळूर