Join us

जपानी पुष्पा अन् श्रीवल्ली! अल्लू अर्जुन आणि रश्मिकाच्या गाण्यावर थिरकलं कपल, पाहा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 09:47 IST

जपानी कपलला पुष्पाची भुरळ, अल्लू अर्जुन आणि रश्मिकाच्या गाण्यावर थिरकले, पाहा व्हिडिओ

Pushpa 2: पुष्पाप्रमाणेचअल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'नेदेखील चाहत्यांना भुरळ घातली आहे. सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच 'पुष्पा २'मधील गाणी व्हायरल झाली होती. सोशल मीडियावर चाहत्यांनी या गाण्यांवर रील्सही बनवले. 'पुष्पा २'मधील फिलिंग हे गाणंही प्रचंड व्हायरल झालं. या गाण्यात पुष्पा आणि श्रीवल्लीचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळाला. अल्लू अर्जुन आणि रश्मिकाच्या या गाण्याची जपानी कपलला भुरळ पडली आहे. 'पुष्पा २'मधील या गाण्यावर जपानी कपलने डान्स केला आहे. 

Kake Taku या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन त्यांचा डान्स व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये जपानी कपल 'पुष्पा २'मधील फिलिंग गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या कपलने पुष्पा आणि श्रीवल्लीसारखे कपडे घातल्याचं पाहायला मिळत आहे. तसंच या गाण्यातील हुक स्टेप्स त्यांनी हुबेहुब फॉलो केल्या आहेत. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जपानी कपलच्या या डान्स व्हिडिओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हे जपानी कपल सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत. बॉलिवूड गाण्यांच्या ते प्रेमात आहेत. याआधीही त्यांनी अनेक बॉलिवूड गाण्यांवर डान्स व्हिडिओ शेअर केले आहेत. 

दरम्यान, 'पुष्पा २'ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. पहिल्या दिवसापासूनच अल्लू अर्जुनच्या पुष्पाने अख्खं मार्केट खाऊन टाकलं आहे. बॉक्स ऑफिस आणि थिएटरमध्येही केवळ 'पुष्पा २'चा बोलबाला पाहायला मिळत आहे. आत्तापर्यंत या सिनेमाने ९७३.६५ कोटींचा गल्ला जमवला आहे. लवकरच 'पुष्पा २' १००० कोटींचा टप्पा पार करेल. 

टॅग्स :पुष्पाअल्लू अर्जुनरश्मिका मंदाना