Join us
Daily Top 2Weekly Top 5

'हनुमान'च्या दिग्दर्शनाची नवरात्रीनिमित्त खास भेट! आगामी 'महाकाली' सिनेमाची शानदार घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 11:32 IST

हनुमान या गाजलेल्या सिनेमाचे दिग्दर्शकाने नवरात्रीनिमित्त आगामी सिनेमाची घोषणा केलीय (hanuman, navratri)

 

यावर्षी एक सिनेमा रिलीज झाला आणि त्या सिनेमाने अनपेक्षितरित्या चांगलंच यश मिळावलं. हा सिनेमा म्हणजे 'हनुमान'. रामायणातील हनुमानावर आधारीत आधुनिक काळात घडलेलं कथानक दाखवल्याने प्रेक्षकांना हा सिनेमा चांगलाच भावला. प्रशांत वर्मा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. प्रशांत यांनी 'हनुमान' सिनेमाचा पुढील भाग 'जय हनुमान'चीही घोषणा केली. पण आता नवरात्रीच्या दिवसात प्रशांत यांनी 'महाकाली' सिनेमाची घोषणा केली. विशेष म्हणजे या सिनेमाच्या निमित्ताने प्रशांत वेगळं युनिव्हर्स तयार करत आहेत.

'महाकाली'ची शानदार घोषणा

नवरात्रीच्या निमित्ताने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रशांत वर्मा यांनी 'महाकाली' सिनेमाची शानदार घोषणा केली आहे. युनिवर्समध्ये आणखी एक पॉवरफुल शक्तीचा सहभाग होतोय, अशी घोषणा करुन प्रशांत वर्मा शेवटी 'महाकाली' सिनेमाचं पोस्टर दाखवतात. या पोस्टरमध्ये वाघाला मिठी मारणारी एक छोटी मुलगी दिसते. या सिनेमाचं कथानक काय असणार, या सिनेमात कोण भूमिका करणार याचा उलगडा लवकरच होईल.

महिला करणार 'महाकाली'चं दिग्दर्शन

प्रशांत वर्मा या सिनेमाचे निर्माते असून साऊथमधील प्रसिद्ध निर्माती-दिग्दर्शक पूजा कोल्लुरु या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळणार आहे. दसऱ्याला या सिनेमाचा आणखी एक टीझर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा आहे. 'हनुमान'नंतर पौराणिक व्यक्तिरेखेवर आधारीत या सिनेमाचं कथानक कसं वेगळं असणार,  याची सर्वांना उत्सुकता आहे. पुढील वर्षी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :Tollywood