Join us

"असा धडा मिळाला की जो..." घटस्फोटाच्या चर्चांमध्ये सुपरस्टार अभिनेत्रीची गूढ पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 14:07 IST

अभिनेत्रीवर मैत्रिणीच्या नवऱ्याला हिसकावून घेतल्याचा आरोप झाला होता. आता घटस्फोट घेण्याची वेळ?

Hansika Motwani Divorce Rumours: अभिनेत्री हंसिका मोटवानी हिचं वैयक्तिक आयुष्य सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं आहे. हंसिकाने व्यावसायिक असणाऱ्या सोहेल कथुरियासोबत २०२२ मध्ये शाही थाटात लग्न केलं होतं. आता त्यांच्या वैवाहिक जीवनात बिनसल्याची चर्चा आहे. हंसिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून सोहेलसोबतचे अनेक फोटो आणि लग्नाचा व्हिडिओ डिलीट केले होते. त्यामुळे दोघे घटस्फोट घेत असल्याच्या चर्चांना अधिक जोर मिळाला होता. त्यानंतर आता या चर्चांना स्वत: अभिनेत्रीनं खतपाणी घातलं आहे.

हंसिका मोटवानीनं गेल्या ९ ऑगस्ट रोजी आपला ३४ वा वाढदिवस साजरा केला. यावेळी तिनं इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली. ज्यात तिनं लिहलं, "नम्रतेने आणि कृतज्ञतेने भरलेली भावना आहे. प्रेमाने वेढलेली असून सोबत केकही आहे.  प्रत्येक छोट्या क्षणाबद्दल मी आभारी आहे.  या वर्षात असा धडा मिळाला की जो मी मागितलाही नव्हता. अशी ताकद सापडली, जी माझ्यात आहे हे मलाही ठाऊक नव्हतं. हृदय भरलेलं आहे. फोन आठवणींनी भरलेला आहे आणि आत्मा शांत आहे. या जादुई वाढदिवसाच्या क्षणांसाठी धन्यवाद, असं तिनं म्हटलं.

हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, डिसेंबर २०२२ मध्ये लग्न झाल्यानंतर ते दोघं सोहेलच्या आई-वडिलांसोबत राहत होते. संयुक्त कुटुंबात राहणं कठीण गेल्यामुळे ते त्याच इमारतीतील दुसऱ्या फ्लॅटमध्ये राहायला गेले. पण तरीही अडचणी संपल्या नाहीत. घटस्फोटाबद्दल अद्याप हंसिका आणि सोहेल या दोघांकडून अधिकृतपणे काहीही सांगितलं गेलेलं नाही. त्यामुळे या चर्चांमध्ये कितपत सत्य आहे, हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.

मैत्रिणीचा पती हिसकावल्याचा आरोपसोहेल कथुरिया हा हंसिकाची मैत्रीण रिंकी बजाज हिचा घटस्फोटीत पती होता. सोहेल आणि रिंकी यांचं लग्न मोडल्यानंतर त्यानं हंसिकाशी विवाह केला. सोहेल आणि रिंकी यांच्या लग्नातही हंसिका सहभागी झालेली होती. सोहेल आणि रिंकी यांचं लग्न मोडल्याचे आरोपही हंसिकावर झाले होते. पण, हंसिका आणि सोहेल यांनी नंतर स्पष्ट केलं की ते दोघं आधीपासून एकमेकांना ओळखत होते. सोहेल हा हंसिकाच्या भावाचा चांगला मित्रही आहे. सोहेल २०२३ पासून सोशल मीडियावर जास्त सक्रिय नाही.  त्याचे सोशल मीडिया अकाउंट प्रायव्हेट आहे.

टॅग्स :हंसिका मोटवानीघटस्फोटलग्नसेलिब्रिटी