Join us

चक्क स्मशानभूमीत रिलीज होणार टिझर! 'या' हॉरर सिनेमाच्या निर्मात्यांचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2024 17:17 IST

पहिल्यांदाच भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासात एका सिनेमाचा टीझर लॉंच सोहळा स्मशानभूमीत होणार आहे. (Geethanjali Malli Vachindi)

आजकाल सिनेमांचं प्रमोशन करण्यासाठी निर्माते कोणत्या नवीन कल्पना लढवतील काही सांगता येत नाही. कधी एखादी मोठी क्रूझ यासाठी बूक केली जाते, तर कधी आलिशान हॉटेल प्रमोशनसाठी बूक करण्यात येतं. अशातच नुकत्याच आलेल्या बातमीनुसार एका आगामी सिनेमाच्या निर्मात्याने हॉरर सिनेमाचा टिझर लॉंच करण्यासाठी चक्क स्मशानभूमीची जागा निवडली आहे.

'गीतांजली मल्ली वचिंडी' (Geethanjali Malli Vachindi) असं या आगामी सिनेमाचं नाव आहे. NDTV  ने दिलेल्या वृत्तानुसार हैदराबाद येथील बेगमपेट स्मशानभूमीत या सिनेमाचा टीझर रिलीज केला जाणार आहे. याविषयीचा प्रोमो पण रिलीज करण्यात आलाय. २४ फेब्रुवारीला रात्री सात वाजता स्मशानभूमीच्या परिसरात या सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात येईल. एकूणच आगामी हॉरर सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच भारतीय सिनेसृष्टीत असा आगळावेगळा इव्हेंट घडत असेल.

हा सिनेमा 'गीतांजली' या सिनेमाचा सिक्वेल आहे. शिवा तुरलापति यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. या सिनेमात साऊथ अभिनेत्री अंजली प्रमुख भूमिकेत आहे. याशिवाय श्रीनिवास रेड्डी, सत्यम राजेश, शकालाका शंकर, ब्रह्मजी, रवि शंकर, राहुल माधव आणि सत्या हे कलाकार सिनेमात झळकणार आहेत. 'गीतांजली मल्ली वचिंडी' सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे. त्यात स्मशानभूमीत सिनेमाचा टिझर लॉंच होणार असल्याने चर्चांना उधाण आलंय. 

 

टॅग्स :Tollywood