Join us

चाहतीने प्रभाससोबत काढला फोटो, अन् 'बाहुबली'च्याच गालावर मारली चापट; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 09:18 IST

प्रभासची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे.

'बाहुबली' फेम साऊथ अभिनेता प्रभासची (Prabhas) क्रेझ जगभरात आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते काहीही करु शकतात. 'बाहुबली' नंतर तरूणी तर त्याच्यावर फिदाच झाल्या आहेत. यानंतर 'आदिपुरुष' सिनेमात तो प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत दिसला. पण हा सिनेमा जोरदार आपटला. तरी 2023 वर्षाच्या शेवटी 'सालार' चित्रपटातून प्रभासने आपली जादू दाखवली. प्रभासचा विमानतळावरील एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यामध्ये एक चाहती चक्क त्याच्या गालावर मारताना दिसत आहे.

प्रभासची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. प्रभास विमानतळावर आल्यावर चाहते सेल्फीसाठी अक्षरश: त्याच्याभोवती घेराव घालतात. त्याचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. प्रभास विमानतळावर येताच एक चाहती त्याच्याजवळ येते. प्रभासही थांबतो आणि हसतच तिच्यासोबत फोटो घेतो. फोटो घेतल्यानंतर चाहतीला प्रचंड आनंद होतो आणि ती अक्षरश: उड्या मारायला लागते. यानंतर बाजूला जाताना ती प्रेमानेच प्रभासच्या गालावर चापट मारते. प्रभासलाही काही सेकंद कळतच नाही की नक्की काय घडलं. नंतर तोही गालावर हात ठेवत हसतो आणि इतर चाहत्यांसोबत फोटो काढायला लागतो.

प्रभासचा 'सालार' नुकताच रिलीज झाला. सिनेमाने 600 कोटींचे वर्ल्डवाईड कलेक्शन केले. तर भारतात सिनेमाने ४०० कोटींचा पल्ला गाठला. 'बाहुबली' नंतर फ्लॉप ठरत असलेल्या प्रभासला 'सालार' ने तारले. प्रशांत नील यांनी सिनेमा दिग्दर्शित केला होता.

टॅग्स :प्रभाससोशल व्हायरलसोशल मीडिया