मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांच्या बहुप्रतिक्षित 'दृश्यम ३' या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची प्रतीक्षा करणाऱ्या चाहत्यांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
९ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या ट्रेलरमध्ये मोहनलाल पुन्हा एकदा आपल्या 'जॉर्जकुट्टी' या गाजलेल्या पात्रात दिसत आहेत. या ट्रेलरची रचना अशा पद्धतीने करण्यात आली आहे की, चित्रपटातील गुपितं उघड न होता प्रेक्षकांना थ्रिल, ड्रामा, सस्पेंस आणि इमोशन्सचा अनुभव मिळत आहे. ट्रेलर पाहून कथेत पुढे काय घडणार, याचा अंदाज लावणे कठीण असून यामुळे सोशल मीडियावर याचीच चर्चा सुरू आहे.
जीतू जोसेफ यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या ट्रेलरला नेटिझन्सकडून मोठी पसंती मिळत आहे. चित्रपटाचे शानदार व्हिज्युअल्स, पार्श्वसंगीत (BGM) आणि दमदार संवादांचं लोक भरभरून कौतुक करत आहेत. आधीच्या दोन्ही भागांप्रमाणेच हा तिसरा भाग देखील रोमांचक असेल, अशी खात्री चाहत्यांना वाटत आहे. मोहनलाल यांच्यासोबत या चित्रपटात मीना, अंसिबा हसन आणि एस्थर अनिल हे जुने कलाकार त्यांच्या मुळ भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय सिद्दीकी, आशा शरथ आणि मुरली गोपी हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
'दृश्यम ३' हा चित्रपट २१ मे २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या वर्षातील सर्वात बहुप्रतिक्षित मल्याळम चित्रपटांपैकी हा एक असून, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट नवीन विक्रम प्रस्थापित करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर अजय देवगणचा 'दृश्यम ३' रिलीज होईल.
Web Summary : Mohanlal's 'Drishyam 3' trailer is out, intensifying anticipation. The thriller promises suspense, drama, and emotions. Releasing on May 21, 2026, it features original cast members. Ajay Devgn's 'Drishyam 3' will follow.
Web Summary : मोहनलाल की 'दृश्यम 3' का ट्रेलर जारी, प्रत्याशा बढ़ी। रोमांच, नाटक और भावनाओं से भरपूर। 21 मई, 2026 को रिलीज़, मूल कलाकार शामिल। अजय देवगन की 'दृश्यम 3' बाद में आएगी।