Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉक्स ऑफिसवर फ्लॉप, पण ओटीटीवर येताच धुमाकूळ; 'धुरंधर' फेम अभिनेत्रीच्या सिनेमाला मिळतेय पसंती, कुठे बघाल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 15:46 IST

थिएटरमध्ये चालली नाही जादू! आता ओटीटीवर धुमाकूळ घालतोय 'हा' सिनेमा, धुरंधर फेम अभिनेत्रीची आहे भूमिका

Trending Movie on OTT : हिंदी सिनेसृष्टीत सध्या ‘धुरंधर २’ या सिनेमाची सर्वत्रच जोरदार चर्चा सुरू आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनमानं रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. कमाईचे अनेक् रेकॉर्ड्स मोडीत सिनेमा प्रेक्षकांचं मन जिंकत आहे.  या चित्रपटातील प्रत्येक पात्र लोकांच्या परिचयाचं झालं असून या चित्रपटातून मुख्य अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री सारा अर्जुनचंही तिच्या कामासाठी कौतुक झालं. एकीकडे धुरंधरचं यश अनुभवत असताना सारा अर्जुन दुसऱ्याच एका कारणामुळे चर्चेत आली आहे. 

अलिकडेच 'धुरंधर 2'च्या एक महिन्याआधी म्हणजेच६ फेब्रुवारीला सारा अर्जुनची मुख्य भूमिका असलेला एक सिनेमा रिलीज झाला होता. युरोफिया असं या सिनेमाचं नाव आहे. मात्र,  बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही. त्यानंतर काही दिवसांतच युरोफिया सिनेामा ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला. डिजिटल प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होताच प्रेक्षकांकडून  या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

'युफोरिया' हा एक सामाजिक थ्रिलर चित्रपट आहे, ज्यामध्ये सारा अर्जुनने एका कठीण परिस्थितीत सापडलेल्या मुलीची भूमिका साकारली आहे.हा चित्रपट समाजिक मुद्द्यांवर देखील भाष्य करण्यात आलं आहे. बॉक्स ऑफिसवर युरोफिया सिनेमाला फारसं यश मिळालं नसलं तरी आता ओटीटीप्रेमींची त्याला पसंती मिळते आहे.  हा चित्रपट ETV Win या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होत असून पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होतोय.

दरम्यान, या चित्रपटात सारा अर्जुनसोबत भूमिका चावला देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. तसेच चित्रपटात विघ्नेश गविरेड्डी, गौतम वासुदेव मेनन, पृथ्वीराज अडाला आणि लिखिता यलमांचली यांच्याही भूमिका आहेत. चित्रपटाला IMDb वर 8.1 रेटिंग मिळालं आहे.

टॅग्स :Tollywoodसिनेमा