Join us
Daily Top 2Weekly Top 5

चित्रपटाची कथाच नव्हे, तर क्लायमॅक्स पाहूनही डोकं भणभणेल! IMDB वर ८.३ रेटिंग, कुठे बघाल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 15:56 IST

ओटीटीवर ट्रेंडिंग आहे 'हा' सिनेमा, पाहताना येईल अंगावर काटा,IMDB वर ८.३ रेटिंग

OTT  Trending Cinema: प्रत्येक आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या विषयांवर आधारित सिनेमे, सीरिज पाहायला मिळतात.त्यात कॉमेडी, सामाजिक मुद्यांवर भाष्य करणारे तसेच प्रेमकथेवर आधारित कथांचा समावेश असतो. ओटीटीवर चित्रपट आणि सिरीज पाहण्याची आवड असणाऱ्यांचं सध्या एक तेलुगू चित्रपट मोठ्या प्रमाणावर लक्ष वेधून घेत आहे. या चित्रपटाला ओटीटीप्रेमींचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. सामाजिक मुद्यांवर भाष्य करणाऱ्या या सिनेमाने विचार करायला भाग पाडतो.

दरम्यान, या चित्रपटाचं नाव ढंढोरा आहे. 'ढंढोरा'मध्ये ग्रामीण भागातील कथा दाखवण्यात आली आहे. जातीयवादावर भाष्य करणारा हा सिनेमाला ओटीटीवर चांगला प्रतिसाद मिळतो आहे. हा चित्रपट केवळ एक साधी प्रेमकथा नाही, तर समाजातील त्या भीषण वास्तव मांडतो. चित्रपटाची सुरुवात एका हृदयद्रावक दृश्याने होते, ज्यात एका वृद्ध महिलेचा मृतदेह दोरीने बांधलेल्या अवस्थेत असतो. त्यानंतर समजतं की ज्या मार्गाने अंत्ययात्रा जाणार होती, त्या ठिकाणी मंदिर बांधलं गेल्यामुळे खालच्या जातीतील लोकांना तिथून जाण्यास मज्जाव आहे. हे दृश्य डोकं भणभणून सोडणारं आहे. त्याचबरोबर चित्रपटात असेही काही सीन्स आहे जे जातीय वादावर भाष्य करतात.

या चित्रपटाची कथा ग्रामीण भागातील जीवन तसेच जातींमधील फरकावर बेतलेली आहे. ही कथा गावातील शिवाजी नावाच्या जमीनदाराभोवती फिरते.जेव्हा शिवाजीची मुलगी सुजाता रवी नावाच्या मुलाच्या प्रेमात पडते, रवी हा मागासलेल्या जातीचा असतो. जेव्हा या जमिनदाराला त्यांच्या नात्याबद्दल कळतं तेव्हा कथेत एक मोठा ट्विस्ट येतो. या चित्रपटात बिंदू माधवी, नवदीप आणि रवी कृष्णा यांसारख्या कलाकारांनी आपापल्या भूमिकांना पूर्ण न्याय दिला आहे.हा चित्रपट जानेवारी २०२६ मध्ये ओटीटीवर प्रदर्शित झाला असून ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहे. चित्रपटाला  IMDbवर ८.३ रेटिंग मिळाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mind-Bending Movie: Gripping Story and Climax! Watch it on Prime.

Web Summary : The Telugu film 'Dhandora' tackles caste discrimination in rural India. A landlord's daughter falls for a lower-caste boy, leading to conflict. Available on Amazon Prime, it has an IMDb rating of 8.3.
टॅग्स :Tollywoodसिनेमा