Join us
Daily Top 2Weekly Top 5

४० वर्षांचा जुना सांगाडा अन् न उलगडलेल्या हत्येचं रहस्य! 'OTT' वरील 'या' ट्रेंडिंग सिनेमासमोर 'दृश्यम' पडेल फिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 15:22 IST

ना कोणतं प्रमोशन अन् नाही प्रसिद्ध चेहरे! ६ कोटींमध्ये बनवलेला ब्लॉकबस्टर थ्रिलर पाहून डोकं होईल सुन्न

Ott Movie: अलिकडच्या काळात सिनेमागृहांपेक्षा चित्रपट ओटीटीवर रिलीज करायला निर्माते प्राधान्य देत आहे. याचं कारण म्हणजे डिजीटल प्लॅटफॉर्मवर  चित्रपट  आणि वेब सीरिज पाहण्याचं वेड झपाट्याने वाढत आहे. विशेष म्हणजे प्रेक्षक दाक्षिणेकडील अॅक्शन. सस्पेंन्स थ्रिलर चित्रपटांच्या नव्या रिलीजची वाट बघत असतात. ओटीटीवर रिलीज होताच या जॉनरचे सिनेमे टॉप ट्रेंडिंग लिस्टमध्ये येतात. अशाच एका चित्रपटाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. कोणतेही प्रसिद्ध चेहरे किंवा मोठे बजेट नसतानाही या चित्रपटाने  छप्परफाड कमाई केली. 

या बहुचर्चित चित्रपटाचं नाव ‘रेखाचित्रम’ आहे. ९ जानेवारी २०२५ ला हा चित्रपट झाला.या मळ्यालम चित्रपटाला समीक्षकांसह प्रेक्षकांचीही चांगली दाद मिळाली.अवघ्या ६ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या चित्रपटाने जगभरात ५५ कोटींची कमाई करत इतिहास रचला आणि तो ब्लॉकबस्टर ठरला.या चित्रपटाचे दिग्दर्शन  जोफिन टी. चॅको यांनी केले आहे, तर कथा जॉन मन्थ्रिकल यांनी लिहिली आहे. या रहस्यमयी थ्रिलर चित्रपटात अभिनेता आसिफ अली आणि अनस्वरा राजन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.  त्यांच्यासोबत चित्रपटात मामूट्टी, मनोज के जयन, सिद्दिकी, जगदीश, साईकुमार, हरिश्री अशोकन आणि इंद्रांस अशी तगडी स्टारकास्ट आहे.

‘रेखाचित्रम’ ची  कथा एका 40 वर्षे जुन्या हत्येभोवती फिरते.मलक्कप्पारा येथे हे हत्या घडते आणि विवेक नावाच्या एका पोलीस अधिकाऱ्याभोवती फिरते.विवेक स्टेशन हाऊस ऑफिसर म्हणून आपल्या पदावर परत येतो आणि त्याला राजेंद्रन नावाच्या एका व्यक्तीच्या रहस्यमय आत्महत्येच्या प्रकरणाचा तपास करण्याचे काम सोपवले जाते.सुरुवातीला ही घटना एक साधी आत्महत्या वाटत असली तरी, विवेक जसजसा तपास पुढे नेतो, तसतसे धक्कादायक रहस्यांचे थर उलगडू लागतात.

या प्रकरणाच्या तपासादरम्यान, राजेंद्रनने त्याच्या मृत्यूपूर्वी काही काळ आधी, अनेक वर्षांपूर्वी घडलेल्या एका गुन्ह्याबद्दल महत्त्वाची माहिती उघड केली होती. या सुगाव्यामुळे कथेला पूर्णपणे वेगळं वळण येतं. ही कथा शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी आहे. 'रेखाचित्रम' हा रहस्य आणि थराराने भरलेला चित्रपट असून सस्पेन्सच्या बाबतीत दृश्यमला टक्कर देतो. हा सिनेमा ओटीटीवर उपलब्ध आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Old skeleton, unsolved murder: 'Rekhachitram' beats 'Drishyam' on OTT!

Web Summary : Malayalam film 'Rekhachitram', a suspense thriller about a 40-year-old murder, is trending on OTT. Despite a small budget, it earned huge profits. The film revolves around a police officer investigating a mysterious death linked to the old crime. Its suspense rivals 'Drishyam'.
टॅग्स :Tollywoodसिनेमा