OTT Movie: हल्ली ओटीटीवर बॉलिवूडसह दाक्षिणात्य चित्रपट पाहण्याची प्रेक्षकांमध्ये कमालीची क्रेझ निर्माण झाली आहे. विशेषत दाक्षिणात्य चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर ट्रेंडिंग असतात. प्रेक्षक दाक्षिणेकडील क्राइम आणि सस्पेन्स थ्रिलर सिनेमांची मोठ्या आतुरतेने वाट बघतात. रिलीज होताच हेच सिनेमे डिजिटल प्लॅटफॉर्मवर ट्रेंडिंगमध्ये येतात.अशाच एका सिनेमाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. अलिकडेच २३ जानेवारीला हा सिनेमा रिलीज झाला असून अवघ्या महिनाभरातच या सिनेमाने ओटीटीवर धुमाकूळ घातला आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
या चित्रपटाचं नाव बेबी गर्ल आहे. हा एक मल्याळम सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे. अरुण वर्मा दिग्दर्शित या चित्रपटाची कथा एका लहान मुलीच्या अपहरणाभोवती फिरते. सुपरस्टार नविन पॉली यांची सिनेमात मुख्य भूमिका आहे. २४ तासांत घडणाऱ्य़ा घटनेवर हा संपूर्ण सिनेमा बेतलेला आहे. दरम्यान, बेबी गर्ल सिनेमात निविन पॉलीसब, संगीत प्रताप, लिजोमोल जोस तसेच अभिमन्यू थिकलन असे कलाकार आहेत.
कथानक
बेबी गर्ल सिनेमाची कथा एका रुग्णालयात सुरू होते जिथे एका तीन दिवसांच्या बाळाचे अपहरण होतं. या घटनेनंतर, पोलिस प्रकरणाचा तपास करतात आणि त्यांना रुग्णालयात काम करणाऱ्या एका पुरूषाचा संशय येतो. त्यानंतर चित्रपटाची कहाणी एक नवीन वळण घेते जेव्हा पोलिसांना मुलीच्या वडिलांवरही संशय येतो. पोलीस मुलीला शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतात.परंतु बराच काळ त्यांना तिचे अपहरण कोणी केले हे कळत नाही. तपासात अनेक धक्कादायक गुपिते उघड होतात. हे ट्विस्ट डोकं सुन्न करणारे आहेत.
५ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २ कोटी रुपयांची कमाई केली आहे. जगभरात त्याचा कलेक्शन ३ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. "बेबी गर्ल" हा क्राइम-थ्रिलर चित्रपट सध्या सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
Web Summary : Malayalam suspense thriller 'Baby Girl' on Sony Liv revolves around a newborn's hospital abduction. Police investigate, suspecting staff and the father, uncovering shocking secrets in this gripping crime drama. Despite a modest budget, the film has garnered global attention.
Web Summary : मलयालम सस्पेंस थ्रिलर 'बेबी गर्ल' सोनी लिव पर एक नवजात शिशु के अस्पताल से अपहरण के इर्द-गिर्द घूमती है। पुलिस जांच करती है, कर्मचारियों और पिता पर संदेह करती है, और इस रोमांचक अपराध नाटक में चौंकाने वाले रहस्यों का खुलासा करती है। कम बजट के बावजूद, फिल्म ने वैश्विक ध्यान आकर्षित किया है।