Join us

प्रसिद्ध कलादिग्दर्शकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, सुपरस्टार अजितची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 09:22 IST

ते सुपरस्टार अजित कुमार यांच्या आगामी 'विदामुयार्ची' या चित्रपटावर काम करत आहे.

 दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून एक वाईट बातमी समोर येते आहे. लोकप्रिय कला दिग्दर्शक मिलन यांचं निधन झालं आहे. दिग्दर्शकाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं बोललं जात आहे. ते सुपरस्टार अजित कुमार यांच्या आगामी 'विदामुयार्ची' या चित्रपटावर काम करत आहे. सुपरस्टार स्टार अजित कुमार यांनी दिग्दर्शकाच्या मृत्यूची माहिती दिली आहे. 15 ऑक्टोबर रोजी सकाळी मिलन यांचं निधन झाल्याचे त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे. 

मिलन फर्नांडीज यांचा जन्म चेन्नईमध्ये झाला आणि 1999 मध्ये त्यांनी तमिळ चित्रपटसृष्टीत काम करण्यास सुरुवात केली. कला दिग्दर्शक आणि प्रॉडक्शन डिझायनर साबू सिरिलचा सहाय्यक म्हणून त्यांनी करिअरची सुरुवात केली. 'सिटिझन', 'रेड और व्हिलन', 'थामीजान' थलपथी विजय आणि चियान विक्रमचा 'अन्नियां' यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. मिलन अनेक तमिळ चित्रपटांचा भाग होते. थलपथी विजय, अजित कुमार, चियान विक्रम, जयम रवी आणि इतर अनेक सुपरस्टार्ससोबत त्यांनी काम केलं आहे. 

2006 मध्ये 'आर्य' चित्रपटातून त्यांनी कला दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. नंतर त्यांनी 'बिल्ला', 'वेट्टाईकरण', 'थुनिवू', 'विवेगम', 'वेदलम' आणि 'सामी 2' सारख्या काही हिट चित्रपटांमध्ये काम केले. मिलन यांच्या निधनामुळे दाक्षिणात्य इंडस्ट्रीवर वशोककळा पसरली आहे.

टॅग्स :Tollywood