South Star Yash: दाक्षिणात्य सुपरस्टार यश हा त्याच्या अभिनयासोबतच हटके स्टाइलमुळेही चर्चेत असतो.साऊथ स्टार यशच्या चित्रपटांची चाहते मोठ्या आतुरतेने वाट बघत असतात.यशचे 'केजीएफ' आणि 'केजीए चॅप्टर २' दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान चालले. या चित्रपटांना केवळ दक्षिणेतच नाही तर संपूर्ण देशभरातून भरभरून प्रेम मिळालं.सध्या तो त्याचा आगामी टॉक्सिक या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे.यामधील यशचा लूक, टॉक्झिक अवतार, दमदार म्युझिक यामुळे सिनेमाकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे. शिवाय अभिनेत्याचा त्यातील एक इंटीमेट सीनमुळे चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याचदरम्यान, अभिनेत्याची एक जुनी मुलाखतीत व्हायरल होत आहे.
अलिकडेच ८ जानेवारी २०२६ ला Toxic: A Fairytale for Grown Ups चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा टीझर प्रदर्शित होताच, त्यातील बोल्ड दृश्ये काहींना खटकली. या विरोधात अनेकांनी महिला आयोगाकडे तक्रार केली. इतकंच नाहीतर या सिनेमातील ते सीन सर्व हटवण्याची मागणी देखील करण्यात येत आहे. याचदरम्यान, यशने एका मुलाखतीत केललं वक्तव्य विशेष चर्चेत आलं आहे.'वीकेंड विथ रमेश' या कार्यक्रमात यशने हजेरी लावली होती. या कार्यक्रमात यशने होस्ट रमेश अरविंद यांच्यासोबत संवाद साधताना म्हटलं होतं,"मी असा कोणताही चित्रपट करणार नाही, जो मला पालकांसोबत पाहताना मला अवघडल्यासारखं होईल."
'टॉक्सिक'च्या टीझरनंतर यशच्या या वक्तव्याची चर्चा होताना दिसते. त्यामुळे सोशल मीडियावर अभिनेत्याला प्रचंड ट्रोल केलं गेलं. काहींनी त्याला धारेवर धरलं आङे तर काही नेटकरी यशच्या बाजूने उभे राहिले आहेत. 'टॉक्सिक' मधून यश पुन्हा एकदा बॉक्स ऑफिस गाजवायला सज्ज झाला आहे. या सिनेमात तारा सुतारिया, नयनतारा, कियारा अडवाणी, हुमा कुरेशी यांची भूमिका आहे. सध्या टीझरमधून नताली बर्न चर्चेत आली आहे. १९ मार्च रोजी 'टॉक्झिक' रिलीज होणार आहे.
Web Summary : Yash's upcoming film 'Toxic' faces controversy over intimate scenes. An old interview where he stated he avoids films causing parental awkwardness has resurfaced, sparking social media debate.
Web Summary : यश की आगामी फिल्म 'टॉक्सिक' अंतरंग दृश्यों पर विवादों में घिरी। उनका एक पुराना साक्षात्कार, जिसमें उन्होंने कहा था कि वह माता-पिता के साथ असहजता पैदा करने वाली फिल्मों से बचते हैं, फिर से सामने आया है, जिससे सोशल मीडिया पर बहस छिड़ गई है।