Join us

'पुष्पा २'मध्ये दारू आणि पान ब्रँडची जाहिरात करण्यास अल्लू अर्जुनने दिला नकार, नाकारली करोडोंची ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2023 13:56 IST

Allu Arjun : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनने कोणत्याही दारू आणि पान ब्रँडची ऑफर नाकारण्याची ही पहिलीच वेळ नाही.

साऊथचा स्टायलिश स्टार अल्लू अर्जुन(Allu Arjun)चा पुढील चित्रपट 'पुष्पा: द रुल' म्हणजेच 'पुष्पा २'(Pushpa 2)ची आतुरतेने वाट पाहत आहे. 'पुष्पा : द राइज'च्या प्रचंड यशानंतर त्याचा सीक्वल खूप कमाई करणार असल्याचे बोलले जात आहे. अशा हिट चित्रपटात प्रत्येक जाहिरात प्लेसमेंटसाठी चांगलेच पैसे दिले जातात. पण अल्लू अर्जुनने आता 'पुष्पा २'साठी मोठ्या ब्रँड डील नाकारल्या आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार अल्लू अर्जुनने त्याच्या चित्रपटासाठी एका मोठ्या ब्रँडचा करार नाकारला आहे आणि त्याचं कारण म्हणजे त्याला आपल्या चित्रपटातून कोणत्याही वाईट सवयीचं समर्थन करायचं नाही. जरी अर्जुन 'पुष्पा' फ्रँचायझीमध्ये एक उग्र व्यक्तिरेखा साकारत असला तरी काही मर्यादा आहेत ज्या त्याला पार करायच्या नाहीत.

अभिनेत्याला करायचं नाही वाईट सवयींचे समर्थन अल्लू अर्जुनने तंबाखू, गुटखा आणि दारूच्या ब्रँडचे समर्थन करणे नेहमीच टाळले आहे. आता गुलटीच्या एका रिपोर्टनुसार त्याने 'पुष्पा २'साठी असाच करार नाकारला आहे. रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की लोकप्रिय मद्य आणि पान ब्रँडने 'पुष्पा २'मध्ये जाहिरात प्लेसमेंटसाठी निर्मात्यांशी संपर्क साधला होता. चित्रपटात जेव्हा जेव्हा पुष्प राजचे पात्र दारू प्यायचे किंवा तंबाखूचे सेवन करायचे तेव्हा या ब्रँडचा लोगो फ्रेममध्ये यायचा. या करारासाठी ब्रँडने निर्मात्यांना १० कोटी रुपयांची ऑफर दिली होती. पण अर्जुनने त्याला नकार दिला कारण त्याला अशा ब्रँडची जाहिरात करण्यासाठी कंफर्टेबल नाही. रिपोर्टमध्ये असे सांगितले जात आहे की, त्याला अशा वाईट सवयींचे समर्थन करायचे नाही.

दारू आणि पान ब्रँडची ऑफर नाकारण्याची ही पहिलीच वेळ नाही

अल्लू अर्जुनने हे पहिल्यांदा केलेले नाही. 'पुष्पा'च्या यशानंतरही त्याला एका टीव्ही जाहिरातीसाठी अशा प्रॉडक्टची ऑफर देण्यात आली होती. पण त्याने स्पष्ट नकार दिला. अर्जुनच्या टीमने सांगितले होते की, तो वैयक्तिकरित्या तंबाखूचे सेवन करत नाही आणि त्याच्या चाहत्यांमध्ये ही सवय वाढवू इच्छित नाही. अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २' १५ ऑगस्ट २०२४ रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत रश्मिका मंदाना आणि फहद फाजील देखील दिसणार आहेत. तेलगूसोबतच हा चित्रपट हिंदी, तामिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेतही प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :अल्लू अर्जुनपुष्पा