Join us

'पुष्पा २'मधील श्रीलीलासोबतचं अल्लू अर्जुनचं पोस्टर रिलीज, 'किसिक' गाणं रिलीज आधीच चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 18:00 IST

Pushpa 2 Movie : साऊथ अभिनेता अल्लू अर्जुनचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'पुष्पा २'मधील आयटम साँग 'किसिक'चे पहिले पोस्टर रिलीज झाले आहे. हे पोस्टर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

साऊथ अभिनेता अल्लू अर्जुनचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'पुष्पा २'मधील आयटम साँग 'किसिक'चे पहिले पोस्टर रिलीज झाले आहे. हे पोस्टर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. या पोस्टरला सोशल मीडियावर खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. पोस्टर पाहिल्यानंतर सर्व या गाण्याची झलक पाहण्यासाठी उत्सुक आहेत. हे गाणे २४ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.

अल्लू अर्जुनने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर पोस्टर शेअर केले आहे, ज्यामध्ये अल्लू अर्जुन नारिंगी रंगाचा शर्ट आणि पँट घातलेला दिसत आहे. श्नीलीलाने डान्स आउटफिट देखील परिधान केला आहे. किसिक गाणे २४ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७:०२ वाजता जगभरात रिलीज होणार आहे. ५ डिसेंबर २०२४ रोजी जगभरात सिनेमा प्रदर्शित होईल.'

'पुष्पा २'चा ट्रेलर'पुष्पा २'च्या २ मिनिटं ४८ सेकंदाच्या ट्रेलरची सुरूवात लोक पुष्पा राजच्या ओळखीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात तिथून होते आणि नंतर पात्राची ओळख करून देते, पार्श्वभूमीत एका महिलेचा आवाज ऐकू येतो, ' नाम नहीं है, पुष्पा मतलब ब्रांड' अल्लू अर्जुनची ग्रँड एंट्री होती, त्यानंतर श्रीवल्लीची म्हणजेच रश्मिका मंदानाची दमदार एन्ट्री होते. 

'पुष्पा २' कास्टचित्रपटाच्या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर ३५० कोटींहून अधिक कलेक्शन केले आणि वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक बनला. रिलीज झालेल्या ट्रेलर आणि गाण्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना, फहाद फासिल, श्रीलीला आणि प्रकाश राज यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

टॅग्स :अल्लू अर्जुनपुष्पारश्मिका मंदाना